ऊसतोड कामगारांची मुले रमली ऊसाच्या फडात

ऊसतोड कामगारांची मुले रमली ऊसाच्या फडात

निफाड। प्रतिनिधी Niphad

दारिद्रयाच्या (Poverty) परिस्थितीशी संघर्ष करतांंना आई-वडील कित्येक वर्षापासून ऊसतोडणी (Sugarcane cutting) करीत आहेत. मात्र आपल्या आई-वडिलांसोबत आलेल्या लहान मुलांचा (Small children) ऊसाच्या फडातील संघर्ष देखील काही थांबण्याचे नाव घेत नाही.

तालुक्यातील गोदाकाठ परिसरात सध्या ऊस तोडणीचा हंगाम ऐन बहरात आला असून या कामगारांसोबत त्यांची लहान मुले आली आहेत. बालवयात शाळेत (school) जावून हाती पुस्तक घेण्याऐवजी ही मुले ऊसाच्या फडात हाती कोयता घेतांना दिसत आहेत. ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांसाठी प्रारंभी शासनाने त्यांच्या अड्डयावर साखर शाळा सुरू केली होती.

त्यांचेसाठी शिक्षण विभागाकडून (Department of Education) पाटी, पेन्सिल (Pencil), दप्तर यासह शालेय पोषण आहार (Nutrition diet) देखील पुरविला जात होता. परंतु गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाने साखर शाळा ही योजनाच बंद केल्याने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य (Academic future) अंधारमय झाले आहे.

निफाड तालुक्याचा (niphad taluka) विचार करता तालुक्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक उभे आहे. परिणामी आता हा ऊस तोडणीस आल्याने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील म्हणजेच वसाका (vasaka), रासाका (rasaka), विठेवाडी, द्वारकाधीश यासह जिल्ह्याबाहेरील संगमनेर (sangamner), कोपरगाव (kopergaon),

कोळपेवाडी, राहता, प्रवरा आदी साखर कारखान्यांचे (Sugar factories) ऊसतोडणी कामगार (Workers) तालुक्याच्या गोदाकाठ पट्टयात मोठ्या प्रमाणात डेरेदाखल झाले आहे. साहजिकच या ऊसतोडणी मजुरांची मुले शिक्षणासह अन्य मुलभूत सुविधापासून वंचित राहत असून यासाठी शासनाने किंवा साखर कारखान्यांनी मजुरांसह मजुरांच्या मुलांना विविध सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

सध्या निफाड तालुक्यात वरील विविध साखर कारखान्यांचे 2 हजार कामगार डेरेदाखल झाले आहे. साहजिकच या कामगारांंबरोबर त्यांची 5 ते 15 वर्ष वयोगटातील लहान मुले देखील ऊसतोडणीचे काम करतांना दिसतात. साहजिकच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे शासनाचे आदेश असतांना दरवर्षी ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोमैल दूर राहत आहे.

शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. जे शाळाबाह्य आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. साहजिकच अशा शाळाबाह्य मुलाचे सर्वेक्षण आता कागदावरच अवतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सर्वसमावेशक प्रयत्न व्हावे.

Related Stories

No stories found.