त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारपासून मुले, वृद्धांना प्रवेश बंंद

त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारपासून मुले, वृद्धांना प्रवेश बंंद
त्र्यंबकेश्वर मंदीर

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी (Trimbakeshwar)

राज्यामध्ये वाढता करोना (corona) विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून (Trimbakeshwar Devasthan Trust) मंदिरात 10 वर्षांच्या आतील मुले आणि 65 वर्षांवरील वृद्धांंना दर्शनासाठी शनिवार (दि.8) पासून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ज्या भाविकांचे लसीचे (vaccination) दोन्ही डोस पूर्ण झाले असतील अशा भाविकांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. देवदर्शन सुरू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला मंदिरात भाविकांची गर्दी वाढली होती. त्याचबरोबर नुकताच त्र्यंबकेश्वरला पालखी मिरवणूक उत्सव (Palkhi procession celebration) होऊन गेला. त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी भाविक, पर्यटकांची गर्दी (Crowds of tourists) वाढलेली होती.

दरम्यानच्या काळात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी त्र्यंबकदर्शन उरकून घेतले होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) आणि केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनीही त्र्यंबकेश्वरला हजेरी लावली होती. सध्या करोनाची तिसरी लाट (third wave of Corona) येण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने याची खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे

तसेच धार्मिक स्थळे (Religious places) आणि गर्दीच्या ठिकाणी नियम लागू करण्याचे धोरण अंमलात आणण्याचे निर्देश तेथील ट्रस्ट आणि व्यवस्थापन विभागाला (Trust and Management Department) दिले आहे. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी सप्तशृंगीगडावर लहान मुले आणि वृद्धांना दर्शन बंद करण्यात आले होते. तसेच मास्कशिवाय आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय इतरांनाही त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश बंदचा निर्णय आज ट्रस्टने घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com