जि. प. शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समुपदेशन जनजागृती

जि. प. शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समुपदेशन जनजागृती

येवला | प्रतिनिधी | Yeola

नवजीवन वर्ल्ड पिस अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन नाशिक (Navjeevan World Peace and Research Foundation Nashik) व सेंटर फॉर सोशल अॅण्ड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, युनिसेफ भागिदार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी (students) बालविवाह जनजागृती कार्यक्रम (Child Marriage Awareness Program) आयोजित करण्यात आला.

जनजागृती कार्यक्रमांतर्गत स्वयंसेविका कांचन सोनवणे यांनी बालविवाहाबाबत (Child Marriage) माहिती विद्यार्थ्यांना दिली. बालविवाहाचे दुष्परिणाम गोष्टी व गाण्याद्वारे सांगितले. मुलीचे वय अठरा व मुलाचे वय एकवीस पूर्ण झाल्यानंतर विवाह (Marriage) करावा. मुलांच्या पालकांना देखील समीना शेख यांनी माहिती देवून जनजागृती केली.

यावेळी येवला तालुक्यातील (yeola taluka) अंगणगाव, बदापूर, धुळगाव, धामोडे चिचोंडी अंदरसुल देशमाने, निमगाव मढ, धामणगाव, पिंपळगाव जलाल, उंदीरवाडी, आडगाव चोथवा अंगुलगाव, नांदूर येथील शाळांमध्ये (schools) विद्यार्थीनींमध्ये जनजागृती करण्यात आली.

दरम्यान स्वयंसेविका कांचन सोनवणे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, तालुक्यातील अजूनही काही शाळा बाकी राहिल्या आहेत. येथेही जनजागृतीसाठी जाणार असून विद्यार्थ्यांना (students) याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमास सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक (teachers) वृंद यांनी देखील सहकार्य विद्यार्थ्यांसोबत विविध खेळ केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com