बालविवाह प्रथा भीषण समस्या

बालविवाह प्रथा भीषण समस्या

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp

बालविवाह प्रथा (Practice of child marriage) आजही भीषण समस्या आहे. आजही भारतातील बालविवाहाचे (child marriage) प्रमाण 47 टक्के हे वास्तव नाकरून चालणार नाही.

फक्त बालविहाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून बालविवाह प्रथा निर्मूलनासाठी युवकांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद अरिफ खान (National Youth Award winner Mohammad Arif Khan) यांनी केले. नेहरू युवा केंद्र नाशिक व युनिसेफ (UNICEF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालविवाह प्रथा निर्मूलन एकदिवसीय कार्यशाळेत (Abolition of child marriage workshop) होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र राज्य निर्देशक प्रकाश मनूरे, सहायक निदेशक प्रतीक करंजकर, जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद आरिफ खान, गोविंद डगळे उपस्थित होते. सुनिल पंजे यांनी प्रास्ताविक केले. युनिसेफचे जिल्हा प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, श्रीकांत यांनी उपस्थितांना बालविवाह प्रथा निर्मूलनासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नाशिक शहर व परिसरातील 75 मुलामुलींनी सहभाग नोंदवला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com