
पेठ | प्रतिनिधी | Peth
तालुक्यातील जांबविहीर (Jambavihir) येथे आई-वडीलांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू (Drowning) झाल्याची घटना घडली आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, समिर पवार (७) (Samir Pawar) असे मृत बालकाचे नाव आहे. तो आपल्या आई-वडीलांसह आंघोळीसाठी गेला होता. यावेळी तो पाण्यात आंघोळीसाठी उतरला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर या घटनेची माहिती मृत बालकाचे आजोबा रविंद्र पवार (Ravindra Pawar) यांनी पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) दिली असता पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान कडक उन्ह्याच्या (Heat) तडाख्याने प्रचंड तापमान (Temperature) वाढत असून दुपारच्या वेळी बालकांचा पाण्याकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे बेफीकीरी अथवा पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे यामुळे धरणांमध्ये बुडण्याच्या घटनांमध्यें वाढ होताना दिसून येत आहे.