विजेचा धक्का लागून बालकाचा मृत्यू

विजेचा धक्का लागून बालकाचा मृत्यू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

दिवाळी सण Diwali Festival मामाकडे साजरा करण्यासाठी आलेल्या सात वर्षीय बालकाचा 7 Years old boy घराच्या छतावरील 11 हजार उच्च दाबाच्या लोंबकळत असलेल्या प्रवाहित वीज तारांचा धक्का electrical shock लागल्याने गंभीररीत्या भाजले गेल्याने दुर्दैवी अंत झाला. तर घरातील सर्व विजेचे उपकरणे जळून खाक झाली. भायगाव शिवारातील Bhaigaon Shivar मुक्ताईनगरात Muktai Nagar घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दोरी काम करणारे भरत चित्ते यांच्या घरावर गत अनेक वर्षांपासून या उच्चदाबाच्या प्रवाहित वीज तारा लोंबकळत आहेत. या तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्या त्वरित काढण्याची मागणी सातत्याने चित्ते यांच्यासह परिसरातील नागरिकांतर्फे केली जात होती. मात्र वीज वितरण कंपनीकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळेच सात वर्षीय बालकाचा बळी गेला आहे.

या घटनेस महावितरणच जबाबदार असल्याने आपद्ग्रस्त कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुक्ताईनगर भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

भायगाव शिवारातील मुक्ताईनगरातील मनोज भटू डोंगरे यांच्याकडे चर्चगेट भागात राहणारा हितेश कृष्णा डोंगरे Hitesh Krushna Dongre(7) हा भाचा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आला होता. दिवाळी मामासह कुटुंबियांसमवेत उत्साहात साजरी करणारा हितेश खेळण्यासाठी मामाच्या घराशेजारील भरत चित्ते यांच्या घराच्या छतावर गेला होता.

खेळता खेळता हितेशचा लोंबकळत असलेल्या 11 हजार उच्च दाबाच्या प्रवाहित वीज तारांना धक्का लागल्याने मोठा आवाज होऊन हितेश सेकंदात 70 टक्के भाजला जाऊन जागीच फेकला गेला. तर भरत चित्ते यांच्या छतावर मोठा खड्डा पडून घरातील टीव्ही, फ्रीज, दिवे, पंखे आदी विजेची सर्व उपकरणे व बटने जळाली.

इतकेच काय घराजवळ असलेल्या खांबावरील पथदीपदेखील तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्टसर्किटने जळाले. काही मिनिटे हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही. उपकरणे जळत असल्याने कुटुंबियांनी छतावर धाव घेतली असता गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत हितेश दिसून आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

गंभीररीत्या भाजले गेलेल्या हितेशला तातडीने प्रथम मालेगावी व नंतर नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले. रात्री त्याची प्रकृती गंभीर बनल्याने उपचारासाठी मुंबई येथील वरळी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार होत असताना हितेशची प्राणज्योत मालवली.

गंभीररीत्या भाजलेल्या हितेशच्या मृत्यूची वार्ता येथे येताच मुक्ताईनगर भागात शोककळा पसरली. डोंगरे कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. वीज वितरणच्या अनागोंदी कारभारामुळेच हितेशचा बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतर्फे व्यक्त केली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून उच्च दाबाच्या तारा धोकादायक स्थितीत असल्याने त्या त्वरित घराच्या छतावरून काढाव्यात, अशी मागणी चित्ते कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांकडून केली जात होती.

मात्र या मागणीची दखल घेतली न गेल्यानेच बालकाचा मृत्यू होऊन घरातील सर्व साहित्य जळाले. या घटनेस वीज वितरणच जबाबदार असल्याने त्यांनी आपद्ग्रस्त कुटुंबियांना नुकसान भरपाई देत या तारा त्वरित काढाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चित्ते कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com