बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर यांचे अपघाती निधन

बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर यांचे अपघाती निधन

जानोरी | वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातुन Dindori Taluka नुकतेच बदली होऊन आलेले पेठ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी Child Development Project Officer रमेश निवृत्ती बनकर Child Development Project Officer यांचे सांगली जवळील विजापूर- गुहागर महामार्गावर बस आणि स्विफ्ट कारचा झालेल्या अपघातात Accident जागीच मृत्यू झाला. सदरची बातमी दिंडोरी व पेठमध्ये समजताच परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिंडोरी तालुक्यात कर्तव्यदक्ष बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून रमेश निवृत्ती बनकर यांची ओळख होती.एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या ठसा उमटवला होता. नुकतेच दिंडोरी तालुक्यातील पेठ येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली होती.

आज बुधवार ३नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने ते आपल्या मूळ गावी जात असतांना दुपारी ३ वाजुन ४५ मिनिटांनी विजापूर- गुहागर महामार्गावर वरील सुलतानगादे गावाजवळ समोरून येणारी देवघाड - विटा बस क्र. एम एच ०७ सी ९१७८ ही बस समोरून येणाऱ्या रमेश निवृत्ती बनकर यांच्या स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच ४५ एन ३८५० या कारला समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात घडून आला.

या अपघातात बालविकास प्रकल्प अधिकारी रमेश निवृत्ती बनकर यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत पत्नी व दोन मुले होते.त्यात त्यांची पत्नी व मुलगा हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे तर त्यांची मुलगी ही सुखरूप आहे. सदर घटना दिंडोरी व पेठ तालुक्यात समजताच एकच शोककळा पसरून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com