मुख्यमंत्र्यांची नुकसानग्रस्त भागाकडे पाठ

निफाड तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये नाराजी
मुख्यमंत्र्यांची नुकसानग्रस्त भागाकडे पाठ

नैताळे। वार्ताहर | Naitale

गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपिटीने (Hail) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) शेतकर्‍यांच्या (farmers) काढणीस आलेल्या

गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान (crop damage) झाले आहे. त्यातच कांदा (onion) व द्राक्षांना (grapes) भाव नसल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी (farmers) सापडलेला असताना मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) शनिवारच्या नाशिक दौर्‍यावेळी निफाडकडे (niphad) पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) नांदूरशिंगोटे (Nandur Shingote) येथे भगवान गडाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) शनिवारी नाशिक जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक संकटात शेतकरी अडकले आहेत. सोंगणीस आलले हरभरा, कांदा, गहू व द्राक्षासह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान (crop damage) झालेले आहे. सोसायटी व बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पिके उभे केली होती. गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष काढणीस आलेले असताना

अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपीटीने उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना कर्ज कसे भरावे व पुढील हंगामात पिके उभे करण्यासाठी भांडवल कसे तयार करावे, याची चिंता असताना अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांचे सात्वन करणे आवश्यक होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांकडे कानाडोळा करीत भगवान गडाचे उदघाटन करून पुढील प्रवासासाठी निघून गेले.

त्यामुळे जिल्हा व तालुक्यातील शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करून शेतकर्‍यांना कोणी वाली नसल्याची भावना व्यक्त केली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की आम्ही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. परंतु, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास नष्ट झालेला असताना शेतकर्‍यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्ही शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

- प्रवीण तळेकर, शेतकरी, रामपूर

गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन शेतकर्‍यांचे सांत्वन करून शेतकर्‍यांना भरीव मदत देणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे वळून पाहत नाही.

- किशोर बोरगुडे, शेतकरी, नैताळे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com