सुरगाण्यातील समस्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल; शिंदे गटाचा पाहणी दौरा

सुरगाण्यातील समस्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल; शिंदे गटाचा पाहणी दौरा

सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) बहुतांश गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी (Cemetery) नसून यासह रस्त्यांची झालेली दुरवस्था, पाणी समस्या (watter issue), जलसंधारणाची (Water conservation) कामे, मजुरीसाठी होणारं स्थलांतर, आरोग्य (health) याबाबत येथे प्रत्यक्ष भेट देऊन

पाहणी व माहिती घेण्यासाठी आलेल्या बाळासाहेब शिवसेनेचे (shiv sena) ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व अन्य जिल्हा पदाधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना माहिती सादर करून सुरगाणा तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन भाऊलाल तांबडे यांनी यावेळी तालुक्यातील नागरिकांना दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेनुसार बाळासाहेब शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव, सहाय्यक सचिव निवृत्ती फणसे आदींनी येथे भेट दिली. यावेळी कळवण (kalwan) येथील पदाधिकारी शरद पगार, दिंडोरीचे सदाशिव गावित यांच्यासह तालुक्यातील हरीभाऊ भोये, विनायक गावित, तुळशिराम पिठे, शास्त्री, प्रकाश पवार, सोमनाथ गांगुर्डे, शांताराम पिठे, भाऊसाहेब पिठे, चिंतामण गायकवाड, पंडित भोये, प्रभाकर महाले, भास्कर चौधरी, मुरलीधर ठाकरे, प्रकाश वळवी, धनराज डंबाळे, अन्ना भरसट, सदाशिव गावित, संजय पवार आदी उपस्थित होते.

सीमावर्ती भागासह संपूर्ण तालुक्यातील विकासकामांचा (Development works) प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही येथे आलो आहे. यावेळी सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या गुजरात (gujrat) सीमेपर्यंत प्रत्यक्ष जाऊन रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याची दुरवस्था पाहून सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील तसेच इतर ठिकाणच्या रस्त्यांची (road), पाणी व्यवस्थेची (watter), आरोग्य (health), वीज (electricity), जलसंधारणाची कामे आदी कामांसह इतर विकास कामांची काय अवस्था असेल याची प्रचिती येते.

अनेक गावांत स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी आहे तर रस्ता नाही. काही ठिकाणी दोन्ही नाहीत. यामुळे ग्रामपंचायतींचीच चौकशी करून सर्व कामांचे ऑडिट करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे करणार असल्याचे यावेळी बाळासाहेब शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी सांगितले. ज्यावेळी ही कामे झाली त्यावेळचे अधिकारी खरे तर दोषी असल्याची टीका त्यांनी करून खरा प्रशासकीय अहवाल सरकारला सादर करण्याचे आवाहन तहसिलदार सचिन मुळीक यांना केले.

तहसिल कार्यालयात तांबडे यांनी तहसिलदार सचिन मुळीक व गटविकास अधिकारी दिपक पाटील यांनाही जिल्हा परिषद, इवद, बांधकाम विभागाकडील रस्ते तसेच पाणी, आरोग्य, रोजगार, शेती, शिक्षण, जलसंधारणाची कामे इत्यादी कामे तुमचा आमचा सर्वांचा सहभाग ठेवून करावीत आणि सुरगाणा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशीही सूचना केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com