मुख्यमंत्री शिंदे मालेगाव दौर्‍यावर; आढावा बैठकीसह नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे येत्या 30 जुलै शनिवारी मालेगाव दौर्‍यावर (Malegaon tour) येत असून

त्यांच्या उपस्थितीत येथील बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात उत्तर महाराष्ट्राची विभागीय महसूल आढावा बैठकीचे (Divisional Revenue Review Meetings of North Maharashtra) आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा कॉलेज मैदानावर मालेगाव तालुक्याच्या (malegaon taluka) वतीने भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा (Official visit of Chief Minister) अद्याप आला नसला तरी प्रशासन यंत्रणा व माजीमंत्री दादा भुसे (Former Minister Dada Bhuse) समर्थक कार्यकर्त्यांतर्फे या दौर्‍याच्या नियोजनाची जय्यत तयारी येथे सुरू करण्यात येत आहे. नाशिक (nashik) ऐवजी प्रथमच मालेगावला उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक (Review meeting) घेतली जाणार असल्याने प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनानेते माजीमंत्री आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray) यांनी काही दिवसापुर्वी शिवसंवाद यात्रेव्दारे जिल्ह्यात मेळावे घेत बंडखोरांवर टिकास्त्र सोडले होते.

विशेषत: बंडखोरी केलेल्या आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या मतदार संघातील मनमाड (manmad) येथे मेळावा घेत ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टिका केली होती. ठाकरे यांच्या या दौर्‍यास शिवसैनिकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसह हा उठाव कां केला गेला यासह माजीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह आ. सुहास कांदे यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे येत्या 30 जुलैला जिल्हा दौर्‍यावर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भुमिकेला माजीमंत्री दादा भुसे यांनी समर्थन देत त्यांच्या उठावाला साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक (nashik) येथे पालकमंत्री नसल्याचे निमित्त साधत नाशिक येथे होणारी विभागीय महसूल आढावा बैठक यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मालेगावी घेण्यात येवून आ. भुसेंना पाठबळ देण्याचे काम केले जाणार आहे. येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात सकाळी 10.30 ते 11.30 या दरम्यान नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांची महसूल आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे घेणार असून यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

पत्रकार परिषद झाल्यानंतर साडेबारा वाजता कॉलेज मैदानावर मालेगाव तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे मनमाड, येवला, वैजापूर व नंतर संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा आज सायंकाळपर्यंत अधिकृतरित्या दौरा प्रशासन यंत्रणेस प्राप्त झालेला नव्हता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित असल्याने आ. भुसे समर्थकांतर्फे नागरी सत्कार व विभागीय आढावा बैठकीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. क्रिडा संकुलावर विभागीय आढावा बैठकीच्या उद्देशाने कार्यकर्त्यांतर्फे पुर्वतयारी सुरू करण्यात आली असल्याचे दिसून आले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मालेगाव दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी मालेगावी भेट देत विभागीय आढावा बैठक होणार्‍या क्रिडा संकुलासह नागरी सत्कार होणार्‍या कॉलेज मैदानाची पाहणी केली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर महसूलसह पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेत त्यांना सुचना केल्या. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत विजयानंद शर्मा, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, तहसीलदार चंद्रजित राजपूत, बांधकाम विभागाचे अभियंता ए.जी. इनामदार आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com