लोहोणेर करोना नियंत्रण समितीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

लोहोणेर करोना नियंत्रण समितीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

लोहणेर । वार्ताहर

करोना उद्रेक काळात संक्रमण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करत ग्रामस्थांची निस्वार्थ सेवा करत उत्कृष्ट काम करणार्‍या लोहोणेर येथील करोना नियंत्रण समितीचे कौतुक करावे लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समिती पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. या जनसेवेबद्दल लोहोणेर ग्रामपंचायतीस करोना नियंत्रणासाठी 25 लाखाचा भरीव निधी देखील देण्याची घोषणा करण्यात आली.

जिल्हा परिषद मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकार लिना बनसोड, उपमुख्य कार्यकारी रविंद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मिटींग आयोजित करण्यात आली होती. यात संपूर्ण महाराष्ट्रातुन करोना यशस्वीरित्या मात देणार्‍या निवडक ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यात लोहोणेर ग्रामपंचायतीला दुसरे स्थान देण्यात आले होते.

लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पुनम पवार व करोना समिती प्रमुख योगेश पवार यांचे लाईव्ह संभाषण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर झाले. या संभाषणात सरपंच पवार यांनी लोहोणेर गावातील संपूर्ण करोना नियंत्रणासाठी राबविलेल्या विविध उपाययोजना व उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.

करोना काळात येथील करोना नियंत्रण समितीने चांगले काम केले आहे. योग्य नियोजन करून करोना बाधीत रुग्णांना विलगीकरण कक्षात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे करोनाचे संकट नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लागला. चागल्या व एकत्रित कामांची ही पावती म्हणावी लागेल.

पूनम पवार, सरपंच, लोहोणेर

Related Stories

No stories found.