दोन हजारांची लाच घेताना मुख्य सहाय्यकास अटक

दोन हजारांची लाच घेताना मुख्य सहाय्यकास अटक

सटाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील घटना

नाशिक । Nashik

सटाणा (Satana) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील (Land Records Office) मुख्य सहाय्यकास (Chief Assistant) लाच घेताना (Taking Bribe) अटक (Arrested) करण्यात आली आहे. सुनील मोरे (Sunil More) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

सटाणा येथील तक्रारदार यांच्या शेतजमिनीची मोजणी (Counting of agricultural land) करण्याच्या कामात चलन देऊन चलनाची माहिती ऑनलाइन (Currency information online) लवकरात लवकर नोटीसा (Notice) देऊन त्यास मदत करण्यासाठी या अधिकाऱ्याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांची मागणी केली.

ही रक्कम अधिकाऱ्याने दि. २९ रोजी उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय सटाणा येथे स्वीकारली. तत्पूर्वी तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे (Bribery and Corruption Department) तक्रार दिल्याने या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com