वाजगाव l Vajgaon (वार्ताहर)

वाजगाव (ता. देवळा) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आनंदमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.

(दि. १९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला सोसाट्याच्या वारा सुटला व मोठ्याप्रमाणात धुळ वाहत असल्याने वातावरणात मोठा बदल होऊन आस्मानी संकटांनी ढग दाटून आल्याने उद्या शिवरायांची जयंती साजरी करता येईल का? अशी खंत वाजगाव गावातील शिवभक्तांना पडली होती.

परंतु तासाभरानंतर वातावरण पूर्व स्थितीत आले आणि सर्वांनी भीतीच्या सुटकेचा श्वास सोडला आणि आज (दि. १९) रोजी सकाळपासून आपल्या राज्याच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली.

यावेळी वाजगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात भगवे झेंडे व पताके लावून संपूर्ण चौक भगवामय झाला.

सकाळी गावातील पोलीस पाटील निशा देवरे व अमोल देवरे या लक्ष्मीनारायण जोडीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले, नंतर ग्रामपंचायत कार्यालयातील प्रतिमेचे पूजन उपसरपंच दिपक देवरे यांनी येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी एकनाथ बच्छाव यांच्या हस्ते करून कर्मचारी व लोकप्रतिनिधी हा भेद - भाव नाहीसा केल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

संपूर्ण दिवस शिवरायांचे गीत, पोवाडे वाजवण्यात येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच दिपक देवरे, जितेंद्र देवरे, भाऊसाहेब नांदगे, शेतकरी संघाचे व्हा.चेअरमन संजय गायकवाड, नानाजी देवरे, प्रदिप देवरे, अशोक देवरे, प्रमोद देवरे, गोठू देवरे, गिरीष आहेर, शशिकांत देवरे, विष्णू देवरे, संदिप देवरे, भाऊसाहेब देवरे, ज्ञानेश्वर देवरे, ज्ञानेश्वर नलगे, ज्ञानेश्वर साबळे, हेमंत देवरे, योगेश देवरे, अतुल देवरे, जनार्दन देवरे, प्रेम देवरे, प्रदिप गोराणे, दिपक गोराणे, सागर देवरे, सनी देवरे, ग्रामविकास अधिकारी जे. व्ही. देवरे, लिपिक शानु देवरे आदी उपस्थित होते.

कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा असला तरी तो आपल्यातील आहे, लोकप्रतिनिधी किती येतात किती जातात पण कर्मचारी हा त्या संस्थेला परिवरप्रमाणे सांभाळून दररोज न चुकता आपली दैनंदिनी कामे प्रामाणिकपणे करत असतो, त्यांच्या ही कामाचा आदर करत आज शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा मान देऊन केला.
दिपक देवरे : उपसरपंच ग्रामपंचायत, वाजगाव