छत्रपती संभाजीराजेंचे इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

छत्रपती संभाजीराजेंचे इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे | Belgaum Kurhe

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) ग्रामीण भागात ठिकठिकाणी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे येणार या आतुरतेने प्रत्येकाने अंगणात रांगोळीचे (Rangoli) सडे टाकले होते. महिलांनी संभाजीराजे यांचे औक्षण केले...

'गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य' या अभियाना अंतर्गत तालुक्यातील गावांमध्ये शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून संभाजीराजे यांचा इगतपुरी तालुक्यात झणझणीत दौरा सुरू झाला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह भरला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

तर स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, छत्रपती युवासेना संस्थापक गणेश कदम आदींनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. तसेच वाडीवऱ्हे (Wadivarhe) येथे छत्रपती संभाजीराजे यांचे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव यांनी स्वागत केले. बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव आदी ठिकाणी पारंपारिक पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात बैलगाडीततून शोभायात्रा काढण्यात आली.

दरम्यान, यावेळी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, तुषार जगताप, एकसंघ मराठा बांधव सेवाभावी संस्था अध्यक्ष तुकाराम जगताप, उपाध्यक्ष प्रताप जाधव , पप्पु शेलार, गोपाळ शिंदे, शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्ष महेश गाढवे, शिवचरीत्रकार विनोद नाठे, दिलीप मालुंजकर, रविकांत धोंगडे, संतोष मुसळे, विलास धोंगडे , शुभम भागवत, गणेश दळवी, यश बच्छाव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com