रामशेज किल्ल्यावर आज छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव

रामशेज किल्ल्यावर आज छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या (Shivakarya Gadekot Sanvardhan Society) वतीने अजिंक्य दुर्ग रामशेजच्या ( Ramshej ) माथ्यावर आज दि.14 मे रोजी सकाळी 9.00 वाजता गोमुखींद्वारात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव (Chhatrapati Sambhaji Maharaj Janmotsav )साजरा केला जाणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील इतिहास लेखक अभ्यासक व दुर्गआभ्यासकांच्या हस्ते शंभुराज्यांचे प्रतिमापूजन, दुर्गपूजन केले जाईल. यासह अखंडित दुर्गसंवर्धन करणार्‍या निवडक संंस्था,जलसंवर्धन कार्य व वणवा विझवणार्‍या पर्यावरण मित्रांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उपरांगेत असलेल्या गडकोटांच्या अस्तित्वासाठी,गेल्या 21 वर्षे अखंडित राबणार्‍या तसेच अजिंक्य दुर्ग रामशेजच्या ऐतिहासिक पाऊलखुणा, वारसा पर्यावरण शोध, संवर्धन, संरक्षणाच्या दृष्टीने अखंडित आभ्यासात्मक श्रमदान कार्य सातत्याने सुरू आहे.

या निमित्ताने नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात 1682 साली झालेल्या अजिंक्य लढ्याच्या स्मृती जागवण्यासाठी तसेच दुर्गसंवर्धन व पर्यावरण, जलसंवर्धनात राबणार्‍यांचे हात बळकट करण्यासाठी दुर्ग रामशेजच्या माथ्यावर गेल्या 11 वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव कृतिशीलपणे राबवला जात आहे.

यंदा शनिवारी सकाळी 9.00 वाजता होणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मोत्सवाला नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. जी. बी. शहा, इतिहास अभ्यासक, लेखक गिरीश टकले, पुरातन नाणी संशोधक, संग्राहक चेतन राजापूरकर, इतिहास लेखक ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ, पोलीस अधिकारी .टेंभेकर, पुरातन आर्कि.ओलॉजी तंत्र अभ्यासक योगेश कासार पाटील, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

यावेळी शिवकार्य गडकोट वतीने सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार असल्याचे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com