…तर आमरण उपोषण करणार; छात्रभारतीने दिला इशारा

…तर आमरण उपोषण करणार; छात्रभारतीने दिला इशारा
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वसतिगृह (Hostel) सुरु ठेवा नाहीतर, शैक्षणिक भत्ते लागू करा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी (Students) घेतली आहे. शासनस्तरावर (Government) तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. निर्णय न घेतल्यास आमरण उपोषणाला (Agitation) बसण्याचा निर्धार छात्रभारतीतर्फे (Chhatrabharati) करण्यात आला आहे...

वसतिगृह विद्यार्थ्यांची काल ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत नाशिक समाजकल्याण (Social welfare) वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या बैठकीत विद्यार्थांनी हा इशारा दिला आहे.

राज्यातील वसतिगृह बंद करुन सरकार निव्वळ जबाबदारी झटकण्याचे काम करत असून तातडीने वसतिगृह सुरु करा. नाहीतर शैक्षणिक भत्ते लागू करा. सन 2019 पासूनचा मासिक निर्वाह भत्ता तसेच सर्व प्रलंबित निर्वाह भत्ते विद्यार्थ्यांना तातडीने वितरीत झालाच पाहिजे. सन 2019 - 20 आणि 2020 - 21 या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा कुठलाही लाभ मिळालेला नाही.

विद्यार्थ्यांना तातडीने स्वाधारचा निधी वितरित करा. मागील 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती योजनेचा बोजवारा उडाला आहे. समाजकल्याण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती (Scholarship) जमा झाली पाहिजे. सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षाची प्रलंबित समाजकल्याण वसतिगृह विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी तातडीने जाहीर करा, अशा विविध मागण्या छात्रभारतीचे सचिव समाधान बागुल (Samadhan Bagul) यांनी अधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com