छटपूजा : गोदातीरी शुकशुकाट, नासर्डीत गर्दीचा महापूर

छटपूजा : गोदातीरी शुकशुकाट, नासर्डीत गर्दीचा महापूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील रामकुंडावर (Ramkund Nashik) आज होत असलेल्या छटपूजेला (chhath puja) पोलिसांनी परवानगी नाकारली असताना नासर्डी नदीत मात्र हजारो महिलांनी छटपूजेसाठी गर्दी केलेली दिसून आली....

उत्तर भारतीयांची नाशिकमधील संख्या मोठी आहे. दरवर्षी छट पूजेला मोठी गर्दी याठिकाणी असते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) आदेश काढत गोदाकाठी छटपूजा (chhath puja on godavari riverside) करण्यास परवानगी नाकारली होती.

यामुळे गोदातीरी गर्दी दिसून आली नाही. मात्र सकाळी छटपूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी हजारो नागरिकांनी नाशिकच्या मध्यवर्ती भागात गर्दी केली होती.

दरम्यान, एकीकडे परवानगी असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत नासर्डी म्हणजेच नंदिनी नदीतील पाण्यात या महिलांनी उभे राहत छटपूजा पार पाडली. यावेळी नंदिनी नदीवर असलेल्या पुलांवर मोठी वाहनांची गर्दीदेखील झालेली बघावयास मिळाली.

मोठमोठ्या आवाजात भक्तिगीते यावेळी वाजवत छटपूजेच्या उत्सवाचा आनंद वाढवण्यात आला. मात्र, बंदी असताना याठिकाणी छटपूजा होत असल्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com