नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

स्पंदन इव्हेंट आणि मॅनेजमेंट कंपनी यांच्यावतीने करोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल स्वराज फाऊंडेशनचे संस्थापक माजी नगरसेवक आकाश छाजेड यांना कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते आकाश छाजेड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पंदनच्या संस्थापिका पूजा आहेर व त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूजा आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. करोना काळात स्वराज फाउंडेशनच्यावतीने चार महिने अन्नछत्र सुरू ठेवण्यात आले होते.

तसेच स्वराज फाउंडेशनच्यावतीने हजारो मास्क सॅनीटायझर तसेच पी.पी.इ. किट चे वाटप करण्यात आले व लोकांमध्ये हे जनजागृतीचं मोठं काम स्वराज फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. त्याबद्दल संस्थापक आकाश छाजेड यांचा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेविका समीना मेमन, माजी नगरसेवक विक्रम खरोटे, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, नीलेश खैरे, अमोल पाटील, एडवोकेट गीतेश बनकर, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन जागृती पाटील यांनी केले.