मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशकात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशकात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

नाशिक | Nashik

अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या बंडात शरद पवारांचे जवळच सहकारी छगन भुजबळ यांचाही समावेश असल्याने पवारांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशकात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Nashik : 'त्या' वादाच्या पार्श्वभूमीवर शिंगाडा तलाव परिसरात तणावपूर्ण शांतता

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पहिल्यांदाच नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून मुंबईहून (Mumbai) निघाल्यापासून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) येथे सुरुवातीला भुजबळांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशकात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Nashik Crime : शिंगाडा तलाव परिसर राडा प्रकरण; नऊ संशयित ताब्यात, चार दिवसांची पोलीस कोठडी

त्यानंतर नाशिक शहरात छगन भुजबळ यांचे आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत स्वागत केले. त्यावेळी भुजबळांभोवती कार्यकर्त्यांनी (Activists) एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर छगन भुजबळ हे त्यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसकडे रवाना झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com