Video : झाशीच्या राणीसारख्या 'त्या' लढल्या अन् जिंकल्याही - छगन भुजबळांची ममतांवर स्तुतीसुमने

Video : झाशीच्या राणीसारख्या 'त्या' लढल्या अन् जिंकल्याही - छगन भुजबळांची ममतांवर स्तुतीसुमने
छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी

झाशीची राणी लक्ष्मीबाई 'मेरी झाशी नही दुंगी' म्हणत जशा लढल्या होत्या अगदी तशाच ममतादीदी लढल्या. त्यांनीही मेरा बंगाल नाही दुंगी म्हणत एकट्या मोदींना उरून पुरल्या. अशा शब्दांत राज्याचे अन्न व पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ममता दीदींवर स्तुतीसुमने उधळली.

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी व केंद्राने पश्चिम बंगालमध्ये सर्व ताकद लावली होती. ममतादीदी विरुद्ध सगळे अशी ही लढाई होती.

याठिकाणी पंतप्रधानांच्या एका दिवासाआड सभा देखील झाल्या. केंद्राचे अनेक मंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. ममता दीदी एकट्या आणि हे सगळे ही अशी लढाई होती.

पण ममता लढल्या आणि प्रचंड बहूमतांनी जिंकल्या. आसाम सोडले तर सगळीकडे बीजेपीला जनतेने नाकारले, असा टोलाही भुजबळ यांनी यावेळी लगावला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com