राज ठाकरेंनी मांडलेला इतिहास धादांत खोटा; भुजबळांची टीका

राज ठाकरेंनी मांडलेला इतिहास धादांत खोटा; भुजबळांची टीका
छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची समाधी बांधली हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलेला इतिहास धादांत खोटा आहे, अशी टीका पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे....

राज यांनी इतिहास तपासून बघावा, इंद्रजित सावंत या इतिहासकारने लिहिले आहे; त्यांनी दिलेल्या दाखलानुसार, 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज यांचे निधन झाले; त्यानंतर संभाजी महाराज यांनी समाधी बांधली.

कालांतराने किल्ला मोगलांच्या ताब्यात होता, त्यानंतर पेशव्यांनी जिंकला. 1773 ते 1818 पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही नाही. पेशव्यांनी सुद्धा समाधीकडे दुर्लक्ष केले असे इतिहास सांगतो.

नंतर महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी समाधी 1869 साली शोधली. पहिली शिवजयंती (Shivjayanti) फुले यांनी साजरी केली. त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते. टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी यासाठी फंड गोळा केला होता.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. उभ्या हयातीत टिळक यांनी एक खडा सुद्धा बसवला नाही. 1926 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहून निधींचे काय झाले विचारले.

ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली; आणि यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराज यांनी चौथरा आणि छत्र बांधले होते. राज का चुकीचे बोलत होते कळले नाही, असे देखील ते बोलले. दरम्यान, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी कालची सभा घेतली होती असे देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.