कामांची गुणवत्ता तपासा; जि.प. अधिकार्‍यांना मित्तल यांचे निर्देश

कामांची गुणवत्ता तपासा; जि.प. अधिकार्‍यांना मित्तल यांचे निर्देश

देवळा । प्रतिनिधी | Devla

केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Government) विविध योजनेंतर्गत तालुक्यात होत असलेली कामे दर्जात्मक व आदर्श होतील याची दक्षता संबंधितांनी घेतली पाहिजे. कामाच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही.

कामे दर्जात्मक होत आहे किंवा नाही याची गुणवत्ता तपासणी (Quality check) संबंधित सर्व खातेप्रमुखांनी सातत्याने करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी येथे बोलतांना दिले. येथील पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली देवळा तालुक्याचा (Devla taluka) आढावा बैठक (Review meeting) घेण्यात आली.

तालुक्यातील ग्रामपंचायत (gram panchayat) स्तरावरील विविध विकासकामे (Development works) तसेच सुरू असलेल्या योजनांचा ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतल्यानंतर मार्गदर्शन करतांना मित्तल बोलत होत्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी (Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi), गटविकास अधिकारी राजेश देशमुख (Group Development Officer Rajesh Deshmukh), भरत वेंदे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत विभागप्रमुख व ग्रामसेवकांचा काम व योजनानिहाय आढावा मित्तल यांनी घेतला. ग्रामपंचायत विभाग, पंतप्रधान घरकुल आवास योजना, ग्रामीण रोजगार हमी योजना, जलजीवन मिशन, बचत गट, स्वच्छ भारत अभियान, पेसा, बांधकाम व बालविकास प्रकल्प, शिक्षण विभाग, आयुष्यमान भारत कार्ड आदी विविध योजनांच्या कामाचा आढावा मित्तल यांनी घेत कामे दर्जात्मक व आदर्श होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना दिले.

माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यालयांमध्ये कागदाचा कमी प्रमाणात वापर करत ऑनलाईन कामाचा वापर जास्त झाला पाहिजे, अशी सूचना करत मित्तल पुढे म्हणाल्या, ज्या शाळांना वॉल कंपाऊंड नाही अशा ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सदरचे काम घेवून शाळांना संरक्षक भिंतीचे काम मार्गी लावले पाहिजे. या योजनेंतर्गत 263 काम आपण करू शकतो त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर वृक्ष लागवडीसाठी गट स्तरावरून प्राधान्य देण्यात यावे, अशी सुचना त्यांनी केली.

केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेच्या सोयीसुविधांसाठी आहे. या योजनांची कामे यशस्वी होण्यासाठी अधिकारी, ग्रामसेवकांनी सकारात्मकता ठेवून काम करण्याची गरज व्यक्त करत मित्तल यांनी योजनांची कामे दर्जात्मक व आदर्श होतील याची दक्षता घेण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. काम गुणवत्ता पुर्ण होत आहे की नाही याची तपासणी सर्व खातेप्रमुखांनी सातत्याने करावी, असे स्पष्ट निर्देश मित्तल यांनी शेवटी बोलतांना दिले. शहरात पेसा अंतर्गत ग्रामस्तरीय कर्मचार्‍यांचे सुरू असलेल्या प्रशिक्षणास कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी भेट देत कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.

आढावा बैठकीपुर्वी राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत दहिवड येथील जिजामाता महिला समुह बचत गटास लोकर व्यवसायासाठी 6 लाख तसेच वाजगाव येथील संघर्ष महिला समुहास साडी सेंटर व्यवसायाकरिता 6 लाख, गिरणारे येथील तुळजाभवानी महिला समूह बचतगटास शेळीपालन करिता 3 लाख रूपयांच्या धनादेशाचे वाटप मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. स्टेट बँक व एचडीएफसी बँकेकडून सदर बचत गटांना हे कर्ज वितरण केले गेले. घरकुल योजना कामात कनकापूर येथील गृह संकुल योजनेबद्दल ग्रामसेविका जयश्री आहेर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मित्तल यांच्या हस्ते सत्कार करत गौरव केला गेला.

आढावा बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी सतिष बच्छाव, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता आर.बी. महाजन, शाखा अभियंता वासंती बोरसे, बांधकाम विभाग उपअभियंता सोनवणे, शाखा अभियंता राजेंद्र चव्हाण, पशुसंवर्धन विभाग डॉ. पजई यांच्यासह विविध खाते व योजना प्रमुख, ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com