डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

सातपूर | Satpur | प्रतिनिधी

डिस्काउंटच्या (Discount) नावाखाली फ्लिपकार्ट हेल्थ प्लसकडुन ग्राहकांची फसवणूक (Fraud) होत असून फ्लिपकार्टद्वारे पुरविण्यात येणारे औषधे डुबलीकेट असल्याचा संशय व्यक्त करत औषधांची तपासणी करावी या आशयाचे निवेदन समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दीपक मालपुरे यांना देण्यात आले आहे...

समर्थ क्रांती फॉउंडेशनच्या वतीने एफडीएला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फ्लिपकार्ट हेल्थ प्लसच्या वतीने सातपूर विभागात (Satpur Division) जाहिरात पत्रिका वितरण करण्यात येत आहे. ग्राहकांना प्रलोभन देत ऍलोपॅथिक औषधावर २५ टक्के सवलतीत औषधे देण्याच्या जाहिरात पॅम्प्लेटवर म्हटले आहे. तसेच ऍलोपॅथिक औषधांची जाहिरात राज्य सरकारच्या परवानगीने केली आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच किरकोळ विक्रेत्याला (seller) १५ ते २० टक्के मार्जिन असतांना फ्लिपकार्डद्वारे दिले जाणारे २५ टक्के मार्जिन कसे? असा सवालही निवेदनात उपस्थित केला आहे. सातपूर परिसरातील एका मेडिकल व फ्लिपकार्ट यांच्या संयुक्ताने औषध वितरण होत आहे. हे औषधे डुप्लीकेट असल्याचा संशय इतर मेडिकल धारकांकडून विचारला जात असून ह्या औषधाची तपासणी व्हावी अशी मागणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दीपक मालपुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी समर्थ क्रांती फाउंडेशनचे संस्थापक धनंजय खाडगीर, अध्यक्ष सुनीता माळोदे, उपाध्यक्ष विजय गायखे, वैशाली कोठावदे, शिवाजी कडभाने, संजय गिराशे, गौरव वाणी, वृषीकेश वणवे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com