चारसूत्री भात लागवड
चारसूत्री भात लागवड |digi
नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात चारसूत्री भात लागवड

कृषी विभागातर्फे मार्गदर्शन

Gokul Pawar

Gokul Pawar

हरसूल l Harsul

प्रगत आणि संवेदनशील शेती पद्धतीच्या बदलत्या यांत्रिकारणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान अवगत करत उत्पन्न वाढीसाठी प्रयन्तशील आहेत.यामुळे कृषी विभागाच्या कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असल्याने शेतकऱ्यांचा शेती उत्पादन वाढीसाठी कल दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच कृषी विभागाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले असल्याचे ही यावरून दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी १५ हजार हेक्टरवर भात आवणीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे तर २७८ हेक्टर आंबा घन लागवड करण्यात आली आहे . नुकत्याच झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या पाश्चभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका कृषी विभागाने वेगवेगळ्या अवगत शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे. यात त्रिसूत्री कार्यक्रम, चार सूत्री भात लागवड, भात पीक कीड रोग नियंत्रण, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, स्वर्गीय गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतीशाळा, दोरीवरील भात लागवड,एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आदी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.हरसूल तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जमतेम ५ ते १५ टक्के शेती चढ -उतारावर असल्याने या कृषी संजीवनी सप्ताहाचा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी,प.स.कृषी अधिकारी विटनोर,हरसूल मंडळ कृषी अधिकारी डॉ.संजय पाटील,कृषी पर्यवेक्षक तात्यासाहेब दिवटे,कृषी सहाय्यक अशोक कर्डेल,अशोक गायकवाड,भगवान चौधरी,संतोष गाडर आदी कृषी विभागाचे अधिकारी ,कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे.यात शेतीशाळा घेण्यात येत आहेत. यावेळी खरशेत येथील शेतकरी गुलाब राऊत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, निरगुडे येथील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचा अवलंब केला असून पिकांची उत्पादक गुणवत्ता तसेच उत्पन्न वाढ या त्रिसूत्री अवलंब करण्यात आला आहे. सरपंच मुरलीधर दळवी, ग्रामसेवक अलका तरवारे, हरिदास मौळे, काशिनाथ भोये आदींसह शेतकऱ्यांनी शेतीशाळेचे मार्गदर्शन घेतले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहात शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर भर पडणार आहे.प्रगत आणि संवेदनशील शेतीकडे कृषी विभागाचे लक्ष असून शेतकरी ही प्रतिसाद देत आहेत.यामुळे नवनवीत शेतीत बद्दल करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.

संदीप वळवी, तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com