दिंडोरीच्या शिक्षकांचे दातृत्व : कोविड लढाईसाठी आरोग्य साहित्य देऊन केली मदत

दिंडोरीच्या शिक्षकांचे दातृत्व : कोविड लढाईसाठी आरोग्य साहित्य देऊन केली मदत

जानोरी । वार्ताहर

करोना सारख्या जागतिक संकटात दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वर्गाने ९ लाख चाळीस हजार रुपयांची वर्गणी जमवून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व इतर वैद्यकीय साहित्य आरोग्य विभागात घेऊन देत मोठी मदत केली असल्याचे प्रतिपादन विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

दिंडोरी पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी समिती येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, लसीकरण जनजागृतीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील जनतेला लस घेण्यासाठी प्रवृत्त करून कोरोना निर्मूलन करण्यासाठी सामाजिक कार्यास हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सचिन वडजे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले.

व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसिलदार पंकज पवार, सभापती सौ. कामिनीताई चारोस्कर, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार,जि प सदस्य भास्कर भगरे, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले, डॉ. गोसावी, शाम हिरे, पत्रकार भगवान गायकवाड, गंगाधर निखाडे, मनोज शर्मा , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, विस्तार अधिकारी के पी सोनार, केंद्र प्रमुख राजेंद्र गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पवार यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी संदीप आहेर यांनीही मार्गदर्शन केले.आभार रावसाहेब जाधव यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघटना पदाधिकारी सचिन वडजे, रावसाहेब जाधव, धनंजय वानले, अनिल गायकवाड,जयदीप गायकवाड, राजेंद्र परदेशी, योगेश बच्छाव , प्रल्हाद पवार, दिगंबर बादाड, रवींद्र ह्याळीज, प्रवीण वराडे, नितीन देवरे, मनोहर देसले, मधुकर आहेर, भर्तरीनाथ सातपुते, संजय निकुंभ, निंबा दात्रे, विलास पेलमहाले, सुभाष बर्डे, निवृत्ती चारोस्कर आदींनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com