धर्मदाय सहआयुक्तच करणार निमा विश्वस्त निवड

धर्मदाय सहआयुक्तच करणार 
निमा विश्वस्त निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निमाच्या (NIMA) विश्वस्त निवडीसाठी धर्मदाय सहआयुतांनी दिलेली मुदत निष्फळ ठरल्यानंतर आता धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून (Offices of the Charity Commissioner) 40 उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्यातूनच काळजीवाहू विश्वस्त मंडळ (Board of Trustees) निर्माण केले जाणार आहे.

निमाच्या पदाधिकार्‍यांच्या वादामुळे संस्थेचे कामकाज 2020 पासून टप्पा आहे धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडून संस्थेवर ‘फिट पर्सन’ (fit person) म्हणून तीन जणांचा प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उद्योजकांच्या वतीने विश्वस्त म्हणून काम करू इच्छिणार्‍यांना आवाहन करण्यात आले होते.

त्यावेळी सात जागांसाठी 39 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातून निवडण्यापेक्षा विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी पुन्हा एकदा उद्योजकांनी (entrepreneurs) सर्व मताने प्रयत्न करून सात नावे द्यावीत असा प्रस्ताव धर्मदाय सहआयुक्तांनी दिला होता. वादविवादातील तीनही गटांनाही त्यात समाविष्ट करून त्या गटांच्या नेतृत्वाचे तीन व्यक्तींना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मात्र सातत्याने बैठका घेऊनही निर्णय होऊ न शकल्याने अखेर धर्मदाय सह आयुक्त टी एस अकाली (Charity Commissioner TS Akali) यांनी 6 डिसेंबर ही तारीख जाहीर केली आहे आता त्यांच्या माध्यमातून विश्वासांच्या मुलाखतींच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता असून, लवकरच त्यावर निर्णय होउन विश्वस्त मंडळ कार्यान्वित होईल,असा विश्वास उद्योजक व्यक्त करीत आहेत

प्रत्यक्षात या सात जणांच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यप्रणालीवर महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. या सात जणांना कोणते अधिकार दिले जाणार आहेत? त्यांची भूमिका काय असणार आहे? निमाच्या घटनेतील विवाद अद्याप मिटलेला नसल्याने त्या घटनेवर पुन्हा वाद होण्याची शक्यता असल्याने कोणती घटना अवलंबली जाईल? थांबलेली निवडणूक प्रक्रिया आहे तेथूनच सुरू होईल की पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवली जाईल? नियमातील मागील कार्यकाळातील माजी अध्यक्षांच्या अस्तित्वाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे या सर्व बाबींवरती निर्णय घेऊनच विश्वस्त मंडळावर जबाबदारी दिली जाणार आहे काय? असा सवाल

- उद्योजक उपस्थित करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com