
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वाढत्या प्रदूषणाला (Pollution) आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने (central government) इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) धोरणाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदूषणमुक्तीच्या दिशेने महापालिकेने पाऊल टाकत शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा पुरस्कार केला आहे. त्याअंतर्गत मनपा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची (Charging stations) उभारणी करण्यात येत आहे.
शहर स्तरावर देण्यात आलेल्या निर्देशांनुसार इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन्सची (Charging stations) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी दिल्ली (delhi) येथील युएनडीपीने (UNDP) देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार नाशिक शहरात (nashik city) 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी (fund) देण्याची तयारी यूएनडीपीने दर्शविली आहे, तर 35 जागांवर केंद्राच्या एन कॅप योजनेअंतर्गत चार्जिंग स्टेशनसाठी प्रस्ताव तयार केला जात आहे.
राज्य शासनाचे सेवानिवृत्त सचिव दीपक म्हैसकर यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar), कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांच्या सोबत आयोजित बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये दोन्ही योजनासाठी निधी कसा मिळवायचा, तसेच यासाठी प्राकलन कसे तयार करायचे या संदर्भात सूचना देण्यात आल्या.प्रत्यक्षात शहर परिसरात 106 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे. मात्र पहिल्या टप्पात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्यात येत आहे.
त्यात प्रामुख्याने मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, मनपा पूर्व, पश्चिम, नवीन नाशिक, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी असे सहाही विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालयालगत, उपनगर, आरटीओ कॉलनीलगत बोधलेनगर, लेखानगर,
गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, तसेच महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी मार्केट, रामसृष्टी उद्यान, रामदास कॉलनी गार्डन, कॉलेज रोड, तपोवन बस डेपो, राजे संभाजी स्टेडिअम, तसेच पालिकेच्या अन्य काही जागा शोधून त्यावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची उभारण्याची योजना आहे.