जिल्हयात नऊ वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचा कारभार प्रभारींच्या हाती

तात्काळ नियुक्तीची होतेय मागणी; वनसंपदेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता
जिल्हयात नऊ वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचा कारभार प्रभारींच्या हाती
USER

नाशिक | Nashik

वनांच्या आणि वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी (Wildlife protection) वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) पदावरील व्यक्ती महत्वाची आहे. मात्र असे असूनही नाशिक वनवृत्त्त्तामधील (Nashik Forest Department) तब्बल नउ वनक्षेत्रांना (Forest Range) वनपरिक्षेत्र अधिकारीच नसल्याचे चित्र आहे.

प्रभारीच्या हाती कारभार देउन शासन दिवस ढकलण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे वनसंपदेचा प्रश्न एरणीवर येण्याची श्नयता आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिक्त असलेल्या ठिकाणी पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारीची नियुक्तीची मागणी (Requirements Of Range Officer) होते आहे.

पश्चिम विभागातील ननाशी (Na naahi), इगतपूरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbak), हरसूल तर पूर्वमधील सुरगाणा, देवळा, येवला, नांदगांव या वनक्षेत्रांचा कारभार प्रभारीवर आहे. तर मालेगाव उपविभागातील सटाणा वनक्षेत्रालाही (Satana Forest Range) वनपरिक्षेत्र (आरएफओ) ची प्रतिक्षा आहे. अशा एकुण नउ ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे पद रिक्त आहेत.

सहा महिने, वर्ष अशा कालावधीपासून ही पदे रिक्त पडून आहे. दुसऱ्या व्यक्तीवर अतिरिक्तची जबाबदारी दिल्याने काम करताना मर्यादा येत आहे. त्यामुळे आरएफओ पदासाठी (RFO Post) पूर्णवेळ व्यक्तीशिवाय पर्याय नाही अशी भावना अनेकजन बोलून दाखवत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने वनसंपदेसह वन्यजिवांचा प्रश्न एरणीवर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती(Maharashtra Gujrat Border) भागात मोठ्या प्रमाणात वनतस्करी होत असते. त्याकरिता जेथे आरएफओ नाही तेथे त्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. हरसूल, त्र्यंबकेश्वर, ननाशी, सुरगाणा, सटाणा आदी ठिकाणी वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून, या परिसरात खैर, अर्जुन, सदा, बेहदा, मोह, सागवान यासारखी अमुल्य वृक्ष आढळून येतात.

नांदगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बोरसे (दि.1) जून रोजी सेवानिवृत्त झाले. येथील पदाची जबाबदारी वनपालाकडे देण्यात आली. येवला, व नांदगांव या वनक्षेत्रात काळवीट, हरिण या वन्यजीवांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी हवाच, याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

नाशिक वनवृत्तातील संवेदनशील असलेल्या नउ वनक्षेत्रांना पुर्णवेळ अधिकारी नसल्याने वनसंपदेच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ननाशी, येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, हरसूल यासारख्या रेंजचे वनपरिक्षेत्र अधिकारी पद रिक्त आहे. या रेंजचा अतिरिक्त भार इतर वनपरिक्षेत्र अधिकार्यांकडे सोपविण्यात आला आहे. पूर्व व पश्चिम वन विभागात प्रत्येकी चार पदे रिक्त आहे.

दहा ते पंधरा दिवसांमध्ये निर्णयाची शक्यता

बद्ल्या विषयीची जबाबदारी शासनाकडे आहे. (दि.३०) जून पर्यत बद्लीवर निर्बध होते, कदाचित पुढील दहा ते पंधरा दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व विभाग,

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com