Video : सिटीलिंकच्या बसमध्ये गुंडांचा हैदाेस; महिलेसह दोन जणांची चालक, वाहकाला मारहाण

Video : सिटीलिंकच्या बसमध्ये गुंडांचा हैदाेस; महिलेसह दोन जणांची चालक, वाहकाला मारहाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या (Nashik NMC) सिटीलिंक (Citilinc) या शहर बसमध्ये महिलेसह तिच्या साथीदारांनी हैदाेस घालून वाहकासह चालकाला जबर मारहाण (Beaten) केल्याची घटना घडली आहे...

हा संपूर्ण प्रकार बसच्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. बसचालक गोकुळ काकड (२७) आणि वाहक यांना मारहाण करण्यात आलेली आहे.

‘आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले’ याचा जाब विचारत संशयित महिला आणि तिच्या साथीदारांनी बस अडवली. तसेच बसमध्ये घुसून चालकाशी वाद घालून मारहाण केली.

वाहक समजावत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात अनाेळखी महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सिटीलिंक बस कंपनीकडूनदेखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मनपाची नव्याने सुरु झालेली सिटीलिंक ही शहर बस सेवा सध्या शहरातील विविध मार्गांवर मार्गक्रमण करत आहे. मात्र, काही समाजकंटक नव्या बसेसकडे लक्ष करत आहेत. रविवारी म्हसरुळच्या बोरगडवरून नाशिककडे निघालेल्या बसच्या चालकाला आणि वाहकाला मारहाण करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com