नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मुंबई-मनमाड, मुंबई-नागपूर दुरंतो, मुंबई-आदिलाबाद, पुणे- नागपूर सुपरफास्ट, पुणे-अजनी, पुणे-अमरावती आदी रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात तसेच थांब्यांमध्ये 1 डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे.

मुंबई-मनमाड गाडी मुंबई सीएसटीहून दररोज 18.15 वाजता सुटेल. मनमाड-मुंबई गाडी मनमाडहून दररोज 6.02 वाजता सुटेल आणि सीएसटीला 10.45 वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव येथे ती थांबेल.

मुंबई-नागपूर दुरंतो सीएसटीहून दररोज 20.15 वाजता सुटेल. नागपूरहून ही गाडी 20.40 वाजता सुटेल. इगतपुरी व भुसावळ येथेच ती थांबेल.

मुंबई-आदिलाबाद सीएसटीहून दररोज 16.35 वाजता सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग, किनवट येथे ती थांबेल.

पुणे- नागपूर विशेष सुपरफास्ट गाडी दर गुरुवारी पुणे येथून 22.00 वाजता सुटेल. दौंड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे ती थांबेल.

पुणे-अजनी गाडी दर शनिवारी पुणे येथून 22 वाजता सुटेल. दौंड, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे ती थांबेल.

पुणे-अमरावती गाडी दर बुधवारी पुणे येथून 15.15 वाजता सुटेल. दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल.

पुणे-अजनी विशेष ही दुसरी गाडी दर मंगळवारी पुणे येथून 15.15 वाजता सुटेल.