मुंबई- आग्रा महामार्गावरील कामामुळे वाहतूकीत बदल

के के वाघ ते जुना उड्डाणपूल जोडणी कामाला सुरुवात
मुंबई- आग्रा महामार्गावरील कामामुळे वाहतूकीत बदल

पंचवटी | Panchavti

जुना उड्डाणपूल आणि क.का.वाघ समोरील नवीन उड्डाणपूल जोडण्याचे काम सुरू होणार असून, यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावरील कामामुळे येथील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ४५ दिवसात क.का.वाघ महाविद्यालय येथे उतरलेला जुना उड्डाणपूल आणि नवीन तयार झालेला उड्डाणपूल जोडण्यात येणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव येथील वाहतूक पर्यायी मार्गानी वळविण्यात येत असून हे बदल काम संपेपर्यंत कायम राहणार आहे. जुन्या उड्डाणपूलावरून मुंबई बाजूकडुन धुळ्याच्या दिशेने वाहतूक सुरू होती.आता द्वारका येथूनच ही वाहतूक खाली उतरविण्यात येईल.

तसेच येथून उड्डाणपुलावर जाण्यासाठी प्रवेश बंद असणार आहे. द्वारका सर्कल येथून वाहने ट्रॅक्टर हाऊस, कन्नमवार पूल, तपोवन चौफुली, संतोष टी पॉईंट, स्वामी नारायण चौक, अमृतधाम चौफुली या मार्गाने धुळे बाजूकडे जातील. रॅम्पवरून उड्डाणपुलावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

धुळे कडून येणाऱ्या वाहनांना सर्व्हिस रोडने क.का.वाघ कॉलेज ते अपोलो हॉस्पिटल पर्यत येथुन उजव्या बाजूने वळण घेऊन स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉईंट, तपोवन क्रॉसिंग, ट्रॅक्टर होऊस आणि द्वारका आणि पुढे उड्डाणपुल असा प्रवास करावा लागणार आहे.

मुंबई कडून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना द्वारका येथून अटग्रेडरोडणे स्वामी नारायण चौकाकडे येऊन उजवीकडून वळण घेऊन औरंगाबाद रोडने मिर्ची हॉटेल सिग्नल रामदास स्वामी मार्ग, जेजुरकर मळा, फेम सिग्नल मार्गे पुणे बाजूकडे जातील.

पुणेकडून मुंबईकडे जाणारी फेम सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन श्री श्री रविशंकर मार्गे वडाळा, पथर्डीरोड, कलानगर सिग्नल , पाथर्डी गावं पुढे पाथर्डी फाटा, पुणेकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक फेम सिग्नल येथून उजव्या बाजूस वळण घेऊन रामदास स्वामी मार्गे, जेजुरकर मळा, मिर्ची हॉटेल सिग्नल औरंगाबाद रोडने, अमृतधाम चौक जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com