सात प्रभागांच्या रचनेत बदल

211 पैकी 200 हरकती फेटाळल्या
सात प्रभागांच्या रचनेत बदल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिका निवडणुकीसाठी ( NMC Election ) बहुप्रतीक्षित अंतिम प्रभागरचना (Final ward composition ) प्रसिद्ध करण्यात आल्याने आता रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकूण 44 प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 211 हरकतीं पैकी 200 हरकती फेटाळण्यात आल्या असून, 11 हरकतींनुसार सात प्रभागांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.त्यामुळे प्रभागाच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग 9, 16, 17, 35 व 37 झालेल्या बदलाचा दिग्गजांना धक्का बसला आहे.

राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 10 मार्च रोजी स्थगित झालेली प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे.सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्यामुळे तत्पूर्वीच अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रारुप प्रभाग रचनेवर जवळपास 211 हरकती दाखल झाल्या होत्या. प्रभाग 5 मधून प्रभाग 3 मध्ये 267 लोकसंख्येशी संबंधित भाग समाविष्ट करण्यात आला आहे.

त्यात प्रामुख्याने राज्य स्वीट्स तसेच पोकार कॉलनी, वैदुवाडी खालील परिसर प्रभाग 5 ऐवजी प्रभाग 3 मध्ये समाविष्ट झाल्याचे समजते. के के वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज च्या प्रभाग 3 मधील काही भाग प्रभाग 5 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 9, 16 व 17 यांच्या सामाईक सीमेेमध्ये बदल झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील काही भाग आता प्रभाग 9 मध्ये जोडण्यात आला आहे. साधू वासवानी रोड कुलकर्णी गार्डन तसेच जुने पोलीस आयुक्तालय ते कॅनडा कॉर्नर अशी सहल शिवबा केली. प्रभाग 17 मधील क्रांती नगरचा भागही प्रभाग 16 मध्ये समाविष्ट झाल्याने चित्र आहे. प्रभाग 37 मधील उत्तम नगर पासून मविप्र जनता विद्यालय समोर विभाग वगळण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 37 मधून काही भाग 35 मध्ये गेलेला आहे.

अंतिमप्रभाग रचना जाहीर करणारे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. कोणत्या प्रभागातून कोणता भाग अन्य ठिकाणी वगळला किंवा समाविष्ट झाला याबाबत मंगळवारी माहिती मिळू शकेल.त्याबोबतचे विवरणपत्र निवडणूक आयोग पाठवतील.

मनोज घोडे-पाटील, उपायुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com