किसान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
नाशिक

किसान रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देशातील पहिली किसान पार्सल रेल देवळालीहून सुरू झाली. मात्र आता ही गाडी दानापूरऐवजी १४ ऑगस्टपासून मुजफ्फरपूरपर्यंत जाणार आहे. गाडीच्या वेळापत्रकामध्ये शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांच्या सोयीनुसार बदल करण्यात आला आहे. ही गाडी दर शुक्रवारी देवळाली रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ वाजता सुटेल.

नाशिकरोडला ती ६.१०, मनमाडला रात्री ७:३०, जळगाव रात्री १०, भुसावळला १०:४५ वाजता पोहोचेल. बुरहानपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापूर या ठिकाणी थांबे आहेत.

मुजफ्फरपूरहून ही गाडी दर रविवारी९:४५ वाजता निघून सोमवारी १९:४५ वाजता देवळालीला पोहोचेल. शेतकरी, व्यापारी, एजंट यांनी शेतीमाल व्यवस्थित पॅक करून जवळच्या रेल्वेच्या पार्सल ऑफिसमध्ये आणावा.

सोबत आधारकार्डची झेरॉक्स द्यावी. शेतकरी, कार्गो अ‍ॅग्री ग्रेटर, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांनी मुख्य पार्सल पर्यवेक्षकांशी संपर्क करावा. किसान रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळाला तर रेल्वेच्या फेर्‍या वाढवण्यात येतील. शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍यांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com