नाशिक |Nashik

बदलत्या काळानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा शिकताना त्यास व्यावहारिकतेची जोड दिली आहे. सोशल मिडीयावर लिखाण कसे करावे, जाहिरात लिखाण, संगणक ओळख, संहिता लेखन अशा विषयांचा समावेश बीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेने नुकतीच सर्व विद्याशाखांमधील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल केला. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना उद्योग, तंत्रज्ञान याच्या बदलत्या गरजांनुसार शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. त्या

साठी स्वतंत्र क्रेडिट कोर्सची रचना केली आहे. पण त्या तुलनेत मानवविज्ञान विद्याशाखेत व्यहारीक शिक्षणाचा फारसा विचार केला जात नाही. हेच लक्षात घेऊन मराठी विषयात व्यावहारिक शिक्षणाचा अंतर्भाव केला आहे. बीएच्या द्वितीय वर्षात "मराठी'चा अभ्यासक्रम बदलताना संगणक, सोशल मीडिया याचा विचार करण्यात आला आहे.

संगणक व मोबाईलवर युनिकोडमधून मराठी मुद्रण, इनस्क्रीप्ट, फोनेटिक कळप्रकार, मराठी टंकलेखन व युनिकोडचा वापर गुगल इनपुट, मायक्रोसॉफ्ट इतर वापर.गुगल फॉर्म, गुगल क्लासरूम, यू. ट्यूब याचा अध्ययनातील वापर, संगणक व मराठी यामध्ये मुक्सस्त्रोतांचा वापर, युनिकोड टंक ओळख, वर्ड एक्सल, पॉवर प्वाईंट. जाहिरात लेखन, मुलाखत लेखन. कार्यालयीन लेखन यामध्ये ट्विटर, वॉट्सऍप, चित्रफिती याचा अनौपचारिक वापर कसा करावा-या प्रत्येक धड्यासाठी १५ तास शिकवले जाणार, एक श्रेयांक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

हा आहे बदल
-प्रकाशन व्यवहार आणि संपादन हा विषय आत्तापर्यंत कोणत्याही विद्यापीठात मराठी विषयात शिकवला जात नव्हता.-संपादन, प्रसारमाध्यमे, नवमाध्यमे, व्यावसायिक पत्रव्यवहार आदी मध्ये सकस, नेमके, आशयपूर्ण लेखन करता येणे, उत्तम संज्ञापण कौशल्य प्राप्त होणे,

ही सध्याची गरज ओळखून अभ्यासक्रमात समावेश-ब्लॉक, फेसबुक, ट्विटर या नवमाध्यमांचे प्रकार समजावून सांगणे, त्याचा वापर करताना साक्षरता, दक्षता आणि परिणाम सांगणे महत्त्वाचे आहे.-वेबसाइट, ब्लॉगसाठी लिखाण करने, व्यावसायिक पत्रव्यवहार समजावून सांगणे व प्रचारमाध्यामांसाठी लेखन