विजेचे वेळापत्रकात बदल करा, अन्यथा होणार तीव्र आंदोलन; संतप्त शेतकऱ्यांचा इशारा

विजेचे वेळापत्रकात बदल करा, अन्यथा होणार तीव्र आंदोलन; संतप्त शेतकऱ्यांचा इशारा

नांदूरशिंगोटे | प्रतिनिधी | Nandurshingote

येथे महावितरण (MSEDCL) दर महिन्याला वीज वितरणाचे वेगवेगळे वेळापत्रक (Electricity distribution schedule) तयार केले जात असून

हे वेळापत्रक (Schedule) शेतकर्‍यांच्या (farmers) दृष्टीने अंत्यत चुकीचेनअसल्याने हे महावितरणने दोन दिवसांमध्ये हे वेळापत्रक बदलत शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन (agitation) करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

नांदूरशिंगोटेमध्ये महावितरण (MSEDCL) कंपनीकडून दर महिन्याला वेगवेगळे वीज वितरणाचे (Power distribution) वेगवेगळे वेळापत्रक तयार केले जाते. त्यानुसार भागात वेगळ्या वेळेला विद्युत पुरवठा (Power supply) होत असतो. मात्र, ऑक्टोबर महिन्यात तयार केलेल्या वेळापत्रकामुळे शेतकर्‍याला (farmers) नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुळात पहिलेच शेतकरी अनंत अडचणींचा सामना करत आहे.

शेतकर्‍यांची पिके वाया गेली असताना देखील उरलेल्या कांदा रोपांवरती शेतकरी कांदा लागवडीचे काम (Onion cultivation work) करत आहे. गैरसोयीच्या वेळापत्रकामुळे रात्रीच्या सुमारास शेतकर्‍यांना पाणी जातांना वन्यजीवांचा धोका देखील पत्कारावा लागत आहे.

सध्या सकाळी 6.20 ते दुपारी 2.20 यावेळेत विद्युत पुरवठा (Power supply) केला जातो. यातहीबळ सकाळी 10.20 ते 12.20 वाजेच्या काळात विद्युत पुरवठा बंद असतो. सध्या कांदा लागवडीचे दिवस असल्याने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विद्युत पुरवठा केल्यास शेतकर्‍यांना त्याचा फायदा होवू शकेल.

शेतकरी वर्गाकडून सकाळी अकरा नंतर शेतीची कामे होत आहे. मात्र, वीजपुरवठा हा अपेक्षित वेळेत होत नसल्याने शेतामध्ये कशीबशी लावलेली कांदा रोपे ही उन्हामुळे जळून जात आहेत. त्यामुळे वीज वितरणने शेतकर्‍यांच्या हितासाठी दोन दिवसांमध्ये वेळापत्रकामध्ये बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com