
मनमाड | प्रतिनिधी Manmad
भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त ( Bharatratna Dr. Babasaheb Aambedkar Jayanti ) शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातून जाणार्या पुणे-इंदौर महामार्गावर ( Pune Indor Highway )वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरून येणार्या-जाणार्या वाहतुकीचा मार्ग ( Traffic diverted )दुपारी 3 वाजे पासून मिरवणूक संपेपर्यंत वळविण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातून सुमारे 40 पेक्षा जास्त रथांची शोभा यात्रा काढली जाणार आहे त्यामुळे पुणे-इंदौर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मालेगाव कडे जाणारी वाहने येवला - विंचुर - लासलगांव-चांदवडमार्गे या मार्गाने जातील.
तर मालेगांवकडुन मनमाडमार्गे येवलाकडे जाणारी वाहने मनमाड मार्गे न जाता ती चांदवड - लासलगांव - विंचुर येवलामार्गाने जातील.दुपारी 3 वाजे पासून मिरवणूक वाहतूक वळविण्यात असल्याचे म्हटले आहे.पुणे-इंदौर महामार्गावरून मालेगाव,धुळे कडे जाणारी आणि येवला,शिर्डी, नगरकडे जाणार्या वाहनांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.