न्यायडोंगरी सोसायटीत सत्तांतर; माजी आ. आहेर गटाला धक्का

न्यायडोंगरी सोसायटीत सत्तांतर; माजी आ. आहेर गटाला धक्का

न्यायडोंगरी । वार्ताहर | Nyadongri

नांदगांव तालुक्याचे (nandgaon taluka) लक्ष लागलेल्या बहुचर्चीत न्यायडोंगरी (Nyadongri) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या (Executive Cooperative Service Society) अटीतटीच्या निवडणुकीत (election)

माजी पं.स. सदस्य शशिकांत मोरे व माजी सभापती विलास आहेर यांच्या शिवसेवा परिवर्तन पॅनलला 13 पैकी 12 जागांवर विजय मिळाला तर माजी आ अनिल आहेर (Former mla Anil Aher), यांच्या समता पॅनलला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागल्याने विजयाने माजी आ. आहेर गटाचे विकास सोसायटीतील वर्चस्व संपुष्टात आले आहे.

न्यायडोंगरी सोसायटीची निवडणूक (Society Election) अत्यंत चुरशीची झाली. शिवसेवा परिवर्तन पॅनलचे संदीप शहाणे, जालम आहेर, विजय पाटील, पद्माकर आहेर, रवींद्र आहेर, पन्नालाल राठोड, पुंडलिक राठोड, मधुकर आहेर, अण्णा वाजे, शांताराम जाधव, उत्तम राठोड, चंद्रकला राठोड यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण राठोड यांच्या नेतृत्वाखाली पाच उमेदवार रिंगणात होते, त्या सर्वांचा पराभव झाला. निवडणुकीत 598 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काल (दि. 4) रात्री 9.30 पर्यंत मतमोजणी सुरु होती.

दरम्यान, मतदानप्रसंगी माजी आ. आहेर यांचा पाय घाईगडबडीत पायरीवरुन घसरल्याने ते किरकोळ जखमी झाले. या निवडणुकीत माजी आ. आहेर यांच्या धर्मपत्नी तथा माजी जि.प. सभापती सुनीता आहेर व प्रतिस्पर्धी चंद्रकला राठोड यांना समसमान 276 मते मिळाल्याने चिठ्ठीच्या माध्यमातून राठोड विजयी झाल्या. सोसायटीचे विद्यमान चेअरमन डॉ. राजेंद्र आहेर, माजी चेअरमन जगन पाटील यांचाही पराभव झाला असून माजी आ. आहेर गटाचे मधुकर आहेर हे एकमेव उमेदवार केवळ दोन मतांनी विजयी झाले.

कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) व आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांच्या मध्यस्थीमुळे न्यायडोंगरी शिवसेनेतील दुफळी मिटविण्यात यश आले. शिवसेनेचे माजी पं.स. सदस्य शशिकांत मोरे व विलास आहेर यांची दिलजमाई झाल्याने शिवसेना पॅनलला यश मिळाले. या विजयाचे शिल्पकार शशिकांत मोरे असल्याचे बोलले जात असून शिवसेना गोटात उत्साह वाढला आहे. मागील जि.प. पंचवार्षिक निवडणुकीत बंडखोरी केलेल्या मोरे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार विजया आहेर यांना पराभव पत्करावा लागून अश्विनी आहेर यांना विजय मिळाला होता.

Related Stories

No stories found.