उद्या त्र्यंबकरोडवरील वाहतुक मार्गात बदल

पीटीसी प्रशिक्षणार्थी बाह्य परिक्षेसाठी नियोजन
उद्या त्र्यंबकरोडवरील वाहतुक मार्गात बदल
USER

नाशिक। प्रतिनिधी

पोलीस उपनिरिक्षकांच्या रोड रन वॉक साठी त्र्यंबकेश्वररोडच्या वाहतुक मार्गात सोमवारी (दि.1) पहाटे 5 ते 10 या वेळात बदल करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसुचना वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी काढली आहे.

यात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी (पीटीसी) मधील प्रशिक्षणार्थीं 668 पोलीस उपनिरिक्षकांच्या बाह्यवर्ग परिक्षेअंतर्गत सोमवारी रोड रन वॉक होणार आहे. हा वॉक पीटीसी, एबीबी, महात्मानगर, जेहान सर्कल, भोसला मिलीटीरी स्कुल, आनंवली चौक व पुन्हा पीटीसी असा होणार आहे.

यामुळे पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या सर्व मार्गावरील वाहतुक डाव्या बाजुने पुर्ण बंद करण्यात येणार असून उजव्या बाजुने दुहेरी सुरू राहणार आहे. याची दखल सर्व वाहनचालकांनी घ्यावी असे आवाहन चौघुले यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com