नाशिक, नाशिकरोडला वाहतूक मार्गात बदल

डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय
नाशिक, नाशिकरोडला वाहतूक मार्गात बदल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी आदेश काढले असून, नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने तेथील मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

नाशिकरोड येथील मिरवणूक बिटको चौक, क्वॉलिटी स्वीटस, मित्रमेळा कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, जव्हार मार्केट, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिकरोड या मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे या मार्गांवर सर्व वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अनुयायांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीची समस्या निर्माण होईल. त्यासाठी अवजड वाहनांना प्रमुख रस्त्यांवर मनाई करण्यात आली आहे.

मुख्य मिरवणूक मार्ग असा: मोठा राजवाडा जुने नाशिक, चौक मंडई, वाकडी बारव, महात्मा फुले मार्केट, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट सांगली बँक, नेहरू गार्डन, देवी मंदिर शालिमार, शिवाजी रोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप होईल. पर्यायी मार्ग : चौक मंडईकडून वाहने सारडा सर्कलमार्गे जातील. फुले मार्केट ते अमरधाम, असेल. टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील. दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक मार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणार्‍या बसेस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल मार्गे सिडको, नाशिकरोडकडे जातील व येतील.

नाशिकरोड मार्ग असा उड्डाणपुलावरून खाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग. दत्त मंदिराकडून बिटको सिग्रलकडे येणारा मार्ग. यासह रेल्वे स्टेशनकडून बिटकोकडे येणारा मार्ग बंद असेल. पर्यायी मार्ग असा सिन्नर फाट्याकडून येणारी वाहने उड्डाणपुलावरून थेट बिटको चौकाकडे जातील. दत्त मंदिर चौकातून सुराणा हॉस्पिटल, आनंदननगरी टी पॉइंट, सत्कार पॉइंट, रिपोर्ट कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनकडे जातील. रेल्वे स्टेशनकडील वाहने सुभाष रोडमार्गे दत्त मंदिर व पुढे मार्गस्थ होतील. तसेच नाशिक-पुणे वाहतूक दत्त मंदिर सिग्रलवरून उड्डाणपूलमार्गे मार्गस्थ होईल. नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील बसेस दत्तमंदिर सिग्रलमार्गे सुभाष रोडवरून जातील. सीबीएसकडे येणारी वाहने नाशिकरोड न्यायालयासमोरून सरळ आर्टिलरी रोडमार्गे जय भवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे पुढे जातील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com