
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक ते नवी दिल्ली विमानसेवेच्या वेळेत येत्या 1 फेब्रुवारीपासून बदल होत असून, ही सेवा आता सकाळी लवकर दिली जाणार आहे. यामुळे नाशिककरांना दिल्लीला पोहोचून दिवसभरात त्यांच्या कामांना अधिक वेळ देता येणे शक्य होणार आहे...
नवी दिल्ली-नाशिक या सेवेसाठी सध्या दिल्ली येथून दररोज सकाळी दिल्लीहुन सकाळी 9 वाजता विमान उड्डाण घेते. ते नाशिकला 10.50 वाजता पोहोचते, तर हेच विमान 11.20 वाजता दिल्लीकडे रवाना होते व तेथे ते दुपारी 1.10 वाजता पोहोचते. या प्रवासात अर्धा दिवस निघून जातो.
या पार्श्वभूमीवर स्पाइसजेटकडून येत्या 1 फेब्रुवारीपासून या सेवेच्या वेळेत बदल केले जात आहेत. नवी दिल्ली येथून सकाळी 6.30 वाजता उड्डाण घेणार असून, ते नाशिकला 8.10 वाजता पोहोचणार आहे, तर नाशिक येथून ते 9 वाजता दिल्लीकडे परतणार असून, तेथे ते 10.50 वाजता उतरणार आहे.
ओझर विमानतळावरून सध्या ’स्पाइसजेट’ च्या वतीने नवी दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठी विमान सेवा दिली जात आहे.
इंडिगोची उद्या अंतिम पाहणी
इंडिगो विमान कंपनी नाशिक विमानतळावरुन विमान सेवा सुरु करण्याबद्दल उत्सुक असून, उद्या इंडिगो कंपनीची वरिष्ठ टिम नाशिक विमान तळाची अंतिम पाहणी करण्यासाठी येणार आहे.
त्यानंतर येत्या 15 फेब्रुवारी पासून विमान सेवा सूरू करण्याचा विचार केला जात आहे. इंडिगो कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्पात नागपूर, गोवा व हैद्राबाद शहरांसाठी विमान सेवा सुरु करण्याचा मनोदय आहे.
नाईट लॅण्डिंगचाही करणार अभ्यास
नाशिक विमानतळावर एचएएल प्रशासनाने विमानसेवा देरारी एमआरओ सुविधा उपलब्ध करुन दिली असून, त्याठिकाणी मोठी दावप्टी असल्याने नाईट लॅण्डिंगसाठी मोठी जागा असल्याने विमान कंपन्यांना आमंत्रित केले आहे. त्यादृष्टीनेही इंडिगोचे अधिकारी आपल्या पाहणी दौर्यात अभ्यास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी नाईट लॅण्डिंगला परवानगी दिल्यास शहराला देशाच्या सर्व प्रमुख शहरांशी जोडणारी अप्रत्यक्ष सुविधा उपलब्ध होणार आहे.