चांदवड: ऐतिहासिक बारवेची स्वच्छता; सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमदान

चांदवड: ऐतिहासिक बारवेची स्वच्छता; सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमदान

चांदवड । प्रतिनिधी | Chandwad

शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या रंगमहालातील बारव (well) म्हणजे जलव्यवस्थापन (Water management) व स्थापत्यशैलीचा अनोखा चमत्कार आहे. याच बारवेतून शहराला कधीकाळी पाणीपुरवठा (water supply) होवून नागरीकांना दिलासा लाभला आहे.

कालौघात मात्र या बारवेकडे पुरातत्व विभागाचे (Department of Archeology) अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने बारव परिसरात प्लास्टीक कचरा (Plastic waste), झाडेझुडपे व घाणीचे साम्राज्य पसरल्याने बारवेचे अस्तित्वच धोक्यात आले असतांना नाशिकच्या (nashik) सह्याद्री प्रतिष्ठानने (Sahyadri Pratishthan) स्थानिक सदस्यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून स्वच्छता अभियान (Sanitation campaign) राबविले. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवसभर श्रमदान करून संपुर्ण बारवेची साफसफाई करून पर्यावरणदिन साजरा करतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

येथील इतिहास प्रसिद्ध अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालातील बारवेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून पुरातत्व विभागातर्फे (Department of Archeology) रंगमहाल नूतनीकरणाचे काम सुरु असून अद्यापही ते अर्धवट अवस्थेत असल्याने रंगमहाल बंद आहे. चांदवड (chandwad) शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या बारवेभोवती प्लास्टिक कचरा व झाडेझुडपे वाढल्याने बारव परिसराला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चांदवड तालुका दुष्काळी असून शहराला ऐन उन्हाळ्यात याच बारवेचे पाणी ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येत होते.

मात्र नगर परिषद (Municipal Council) स्थापन झाल्यापासून या बारवेकडे दुर्लक्ष झाले आहे. कधीकाळी चांदवड (chandwad) शहरासह संपूर्ण तालुक्याची तहान भागवणार्‍या बारावेची दैन्यावस्था बघून नाशिक (nashik) येथील सह्याद्री प्रतिष्ठान व स्थानिक सदस्यांनी जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत अनेक तरुण-तरुणींनी सहभाग घेत काळाच्या ओघात ऐतिहासिक बारव नष्ट होऊ नये व अहिल्यादेवींच्या समाजकारणाची प्रेरणा घेत समाजसेवा करण्याचे व्रत जोपासले. अशोक व्यवहारे, तुषार झारोळे, धनंजय निलसकर, योगेश पगार, नितीन शेळके आदींसह सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

चंद्रेश्वर डोंगरावर वृक्षारोपण

चांदवड येथील प्रसिद्ध चंद्रेश्वर डोंगरावरील मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चांदवड वनपरिक्षेत्र विभाग, नगरपरिषद व स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मंदिर परिसर प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी वृक्षारोपणासह परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. अभियानात चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सचिन निकम, दीपक हांडगे, स्वच्छता व पाणीपुरवठा अधिकारी सत्यवान गायकवाड, भाऊसाहेब चव्हाणके, स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य, वनकर्मचारी व नगरपरिषद कर्मचारी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com