मिशन महापालिका : बावनकुळेंचा नाशिक दौरा अन् कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह

मिशन महापालिका : बावनकुळेंचा नाशिक दौरा अन् कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह

नाशिक | फारूक पठाण | Nashik

नाशिक महापालिका निवडणूक (NMC Election) कधी होणार हे अद्याप निश्चित नसले तरी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाशिक महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठित केली आहे...

या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे पहिल्यांदा नाशिक दौरावर (Nashik Tour) आले होते.

त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आल्याने वातावरण भाजपमय झाले होते. दरम्यान त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.

2017 च्या निवडणूक प्रचारात त्यावेळीचे मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. यानंतर वातावरण बदलून नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला (BJP) तब्बल 66 नगरसेवकांचे गिफ्ट नाशिकरांनी दिले. यामुळे सलग पाच वर्षे भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता महापालिकेत राहीली.

मिशन महापालिका : बावनकुळेंचा नाशिक दौरा अन् कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या (Central Government) मदतीने महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी (Funde) आणण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये विशेष करून 1823 कोटी रुपये नमामि गोदा प्रकल्पासाठी (Namami Goda Project) मंजूर करून देखील त्यांनी आणले.

भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीवारी करून गोदा प्रकल्पासाठी निधी मंजूर करून आणला. त्याचप्रमाणे लॉजिस्टिक पार्क (Logistic Park) असो की आयटी पार्क (IT Park) यांचे देखील केंद्रीय मंत्राच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यामुळे यातील अनेक कामांना ब्रेक लावण्याचे काम झाले होते.

मिशन महापालिका : बावनकुळेंचा नाशिक दौरा अन् कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह
इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू

तर 13 मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाल्यामुळे देखील कामांची गती मंदावल्याचे दिसून आले. दरम्यान आता पुन्हा राज्यात शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आले आहे.

भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष झाल्यामुळे मागील पाच वर्षात ज्या विकास कामांचे नियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते ते सर्व कामे पूर्ण होणार असा दावा करण्यात येत आहे, तर दुसरीकडे नाशिक महापालिकेत तीन सदस्य प्रभाग रचना बदलून नव्याने प्रभाग रचना करण्याचा देखील मानस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक दिवसीय नाशिक दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी देखील झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष मानला जातो. नेते, कार्यकर्ते निवडणुकीसाठी तयार असते बूथ पासून पन्ना प्रमुख तसेच अर्धा पन्ना प्रमुख देखील भारतीय जनता पक्षाच्या ताफ्यात आहे.

मिशन महापालिका : बावनकुळेंचा नाशिक दौरा अन् कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह
मविप्र निवडणूक : गड आला पण सिंह गेला

तर दुसरीकडे मध्य नाशिक, पश्चिम नाशिक व पूर्व नाशिक या तीन मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) सध्या केंद्रीय मंत्री आहे. यामुळे नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्ता आणणे कठीण नाही तरीही पक्षाच्या वतीने कोणत्याही प्रकारे कमतरता ठेवण्यात येणार नाही, असे स्पष्ट होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकला घेऊन पुढचा महापौर शिवसेनेचा (Shivsena) असे सांगायचे, मात्र मागील काही काळात अनेक राजकीय घडामोडी घडवून राज्यात सत्तांतर झाले आहे तर दुसरीकडे खा. राऊत सध्या तुरुंगात आहे.

या पार्श्वभूमीवर जर नाशिक महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे हे पक्षाला माहित असल्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी देखील कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

जंगी स्वागत

राज्याची सूत्र स्वीकारल्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदा आलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. मोठे हार जेसीबीचे साह्याने त्यांना देण्यात आले तर बाईक रॅली देखील काढण्यात आली. यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीचे बिल वाढण्याचे दिसून आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com