
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण आढावा बैठकीत नाशिकमधील नद्यांसाठी भरीव काम करणारे चंद्रकिशोर पाटील (Chandrakishore Patil) यांना आमंत्रित करण्यात आले...
चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांनी मन की बात या कार्यक्रमात स्वछाग्रही म्हणून गौरव केला आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी त्यांच्या कामाची माहिती घेतली. उंटवाडी (Untwadi) येथील नंदिनी नदीच्या (Nandini River) पुलाजवळ शिट्टी मारून लोकांना नदीपात्रात कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली गेली आहे.
यावेळी गमे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पाटील यांचा नाशिकचे स्वच्छतादूत म्हणून 26 जानेवारी रोजी सन्मान करण्याची सूचना दिली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषद CEO अशिमा मित्तल, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे, राजेश पंडित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.