चांदोरीच्या तंत्रस्नेही शिक्षकास एक लाखांची शिष्यवृत्ती

चांदोरीच्या तंत्रस्नेही शिक्षकास एक लाखांची शिष्यवृत्ती

चांदोरी | वार्ताहर Chandori

येथील रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) न्यु इंग्लिश स्कुल चांदोरी (New English School Chandori) विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक प्रशांत पगार (Prashant Pagar) यांनी नुकत्याच झालेल्या वोडाफोन इनोवेटीव्ह टिचर्स अवॉर्ड (Vodafone Innovative teachers award) स्पर्धेत तब्बल १ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे...

व्होडाफोन, आयडिया यांच्या सीएसआर फंडातून उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या देशभरातील हजारो उपक्रमशील शिक्षकांमधून निवडक 200 शिक्षकांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

नामांकन, सादरीकरण व मुलाखतीद्वारे निवडण्यात आलेल्या शिक्षकांना दर्जेदार शैक्षणिक कामकाजासाठी रु.1 लाख रकमेची शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते.

केंद्र सरकारची NSDL ही बेंगलोर येथील संस्था प्रस्तावांची छाननी व मुलाखतींद्वारे गुणवत्तापूर्ण कामकाज करणाऱ्या शिक्षकांची निवड करते. रयत शिक्षण संस्थेतील उत्तर विभागातील एकमेव डी एड शिक्षक पगार हे ठरले आहेत.

आजवर त्यांचे 5 शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. शासनामार्फत घेण्यात येणारी नवोपक्रम स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन यात राज्यस्तरीय यश प्राप्त केले आहे. नाशिक जिल्हा गुणवत्ता कक्षाचे सदस्य म्हणून काम केले आहे.

त्यांचे विद्यार्थी उपक्रमावर आधारित आजवर 11 लेख विविध मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून अनेकविध उपक्रम शाळेत राबवले आहेत. माध्यमिक विभागात 2016-17 साली लोकसहभागातून 44 टॅब्लेट सह जिल्ह्यातील पहिला टॅब्लेट क्लासरूम (Tablet Classroom) सुरू केला.

प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टीक संकलनातून वाचन कट्टा (Readers Katta) देखील विद्यालयात बांधला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना तंबाखु, सिगरेट सारख्या व्यसनापासून परावृत्त केलेबद्दल सलाम फाउंडेशनचा व्यसनमुक्ती साठी राज्याचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला आहे.

रयत शिक्षण संस्थेचा (Rayat Shikshan Sanstha) उपक्रमशील पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. कोविड काळात ऑनलाइन अध्यापनासोबतच त्यांनी तयार केलेले शालेय स्पर्धा परीक्षेचे विविध अँपचा आज राज्यभरातील सुमारे 60000 विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाइन स्कुल एड्यूकेशन उपक्रमात ते विभागीय समन्वयक म्हणून उल्लेखनीय सहभाग घेत आहे. त्यांच्या या यशामध्ये विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.

पगार यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समिती, स्थानिक स्कुल कमिटी, तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य इंद्रकुमार त्र्यंबके, पर्यवेक्षक भाऊसाहेब माने, पांडुरंग जगताप यांच्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्राकडून पगार यांचे अभिनंदन होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com