
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) (YCMOU) प्रभारी कुलसचिवपदाचा (Registrar-in-Charge) कार्यभार परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील (Controller of Examination Bhatuprasad Patil) यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला.
डॉ. प्रकाश देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रभारी कुलसचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत विनंती केल्यावरून कुलगुरू डॉ. पी जी पाटील (Vice Chancellor Dr. PG Patil) यांनी हा निर्णय घेतला. नवनियुक्त प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील 1992 पासून विद्यापीठ क्षेत्रात कार्यरत आहेत.
या पूर्वी त्यांनी जळगावच्या (jalgaon) बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (North Maharashtra University) व सोलापूर विद्यापीठात (Solapur University) परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच सोलापूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. जुलै 2022 पासून डॉ. देशमुख यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार होता. तो काल श्री. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.