सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव नियोजनाची बैठक

सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव नियोजनाची बैठक

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad

श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड येथे सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 30 मार्चपासून सुरू होणार आहे. गडाच्या शिखरावर चार एप्रिल रोजी कीर्तिध्वज फडकणार आहे. तर सहा एप्रिलपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रोत्सवाची नियोजन बैठक गडावर झाली. यात्रेच्या नियोजनासाठी विविध शासकीय, अशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व विश्वस्त संस्थेच्या विविध विभागांची बैठक कळवणचे तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीत यात्रा नियोजन विविध विभाग व त्यांचे तालुका, जिल्हा व विभागस्तरावरील विविध अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आदींसह चर्चा करण्यात आली. तहसीलदार कापसे यांनी सूचना दिल्या. तसेच शासकीय व निमशासकीय विभागातील पदाधिकार्‍यांनी यात्रेसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती तसेच संभाव्य आवश्यकताबाबतचे तपशील सादर केले.

चैत्रोत्सवात चौदसच्या दिवशी मंगळवारी (दि. 4 एप्रिल) भगवतीच्या कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन होऊन मानकरी गवळी परिवारातील प्रतिनिधींच्या माध्यमातून भगवतीच्या पर्वत शिखरावर सदर दिवशी रात्री ध्वजारोहण होणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने सभेत देण्यात आली.

यावेळी कळवण पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, उपविभागीय रुग्णालय अधीक्षक डॉ. असिक शेख, राज्य उत्पादन शुल्क मुख्य निरीक्षक ए. बी. सोनार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गो. वी. कासार, राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक अ. भ. सिप्पा,

आगार व्यवस्थापक हेमंत पगार, सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए. जी. गायधनी, ए. एस. पवार, राज्य विद्युत महामंडळ अधिकारी पी. एस. उगलमुगले, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, सरपंच सुभाष राऊत, सरपंच सप्तशृंगगड रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, रोपवे अभियंता समाधान खैरनार आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com