सप्तशृंगीगडावर आजपासून चैत्रोत्सव

सप्तशृंगीगडावर आजपासून चैत्रोत्सव

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवी गडावर (Shri Saptashrungi Devi Gad) यंदा चैत्रोत्सव (Chaitrotsav) तब्बल दोन वर्षानंतर उत्साहात साजरी होत आहे...

खान्देशसह देशभरातील यात्रेकरू व पायी दिंडी (dindi) काढणार्‍यांच्या गर्दीने यंदा वातावरण भक्तिमय होईल. यासाठी ट्रस्ट (Trust) व प्रशासन (Administration) सज्ज झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे (corona) नवरात्रोत्सव (Navratri festival) व चैत्रोत्सव यात्रा रद्द झाल्या होत्या. शासनाने करोनाचे सर्वच नियम शिथिल केले असल्याने यंदा रामनवमी (ramnavmi) दि.10 एप्रिल पासून सुरू होणार्‍या

चैत्र यात्रेत खान्देश नगरीतून पायी येणारे शेकडो भाविक, देशाच्या कानाकोपर्‍यातून फर्निक्युलर ट्रॉलीचे (Fernicular trolley) आकर्षण म्हणून येणारे पर्यटक (Tourist) यांची रेलचेल दिसणार आहे. रोजगारपासून तब्बल तीन वर्षांपासून वंचित राहणारे स्थानिक व्यावसायिक व देणगी स्वरूपात थंडावलेली तिजोरी पाहता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व कर्मचारी यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहे.

पायी दिंडी धारकांना पर्वणी

यंदा तब्बल तीन वर्षानंतर धुळे (dhule), जळगाव (jalgaon), नंदुरबार (nandurbar) यासह संपूर्ण खान्देश नगरीतून येणारे व एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात पायी दिंडीच्या माध्यमातून येणारे भाविक, भक्त व युवा पिढी (younger generation) यांची यंदा भगवतीच्या दर्शनासाठी गर्दी होईल. खान्देशच्या अर्थात जळगाव जिल्ह्यातील (jalgaon district) एरंडेल तालुक्यातील खर्ची गाव म्हणजे श्री सप्तश्रृंगी देवीचे माहेर आहे.

असा उल्लेख पुराणात असल्याने खान्देश भागातून शेकडो दिंड्या चैत्रोत्सव काळात पायी वाटेने गडावर येत असतात. तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्या कुलदैवताला भेटण्यासाठी भाविक आतुर आहेत. त्यांच्या येण्याची आस सप्तश्रुंगी गडावरील स्थानिक व्यावसायिक वर्गाला लागली आहे. कोव्हिडं काळात मंदिर बंदमुळे ठप्प झालेला व्यवसाय व निर्माण झालेली बेरोजगारी गडावरील ज्वलंत प्रश्न यंदा सुटणार आहे.

असा असेल चैत्रोत्सव

येत्या दि.10 एप्रिल रामनवमीला चैत्रोत्सवास सुरुवात होणार असून,सलग दहा दिवस गडावर भाविकांची रेलचेल राहील. दि.16एप्रिल च्या मध्यरात्री सालाबादप्रमाणे कळवण तालुक्यातील दरेगाव येथील एकनाथ गवळी सप्तश्रृंगी देवी गडाच्या माथ्यावर किर्तीध्वज फ़डकवतील. येत्या दि.14 व 15 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुड फ्रायडे असल्याने गडावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

यात्रेसाठी प्रमुख निर्णय

  • नांदुरी ते गड खाजगी वाहतूक बंद. बससेवा सुरू.

  • मंदिर 24 तास खुले.

  • चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दर्शनासाठी व परतण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग

  • सुरक्षेच्या दृष्टीने 4 डोअर मेटल डिटेक्टर, 12 हँण्डल डिटेक्टर.

  • 60 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे.

  • पाच ठिकाणी मोफत आरोग्यसेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र.

  • पिण्याच्या पाण्यासाठी 10 ठिकाणी पाणपोई व टँकरची व्यवस्था.

  • पहिल्या पायरीवर पोलिस नियंत्रण कक्ष.

  • 24 तास अखंडीत विजपुरवठा.

  • दर्शन रांगेत 15 ठिकाणी बार्‍या

Related Stories

No stories found.