कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती थेट शेतकऱ्यांतुन निवडावा : चुंभळे

कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती थेट  शेतकऱ्यांतुन  निवडावा : चुंभळे

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

सगळ्या नगर पंचायती (panchayat samiti), नगर परिषद (nagar parishad) व नगरपालिका (Municipality) यांचा नगराध्यक्ष व ग्रामपंचायतीचा सरपंच थेट जनतेतून निवडून द्यावा अशी घोषणा

शिंदे (eknath shinde) व फडणवीस (Fadnavis) सरकारने केली याच पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Agricultural Produce Market Committee) अध्यक्ष (सभापती) (Chairman) देखील थेट शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवडून आणावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी चुंबळे (Shivaji Chumble, former chairman of Agricultural Produce Market Committee) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) नाशिक तालुका (nashil taluka), शहर, पेठ (peth), दिंडोरी (dindori), त्रंबकेश्वर (Trambakeshwar), हरसुल (harsul) असा भाग येतो. यात एकूण ६ आमदारांच्या (MLA) मतदारसंघातून सुमारे ६ लाखाहून अधिक शेतकरी मतदार (voter) आहेत.ते संचालक मंडळाला निवडून देतात. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती हा सध्या संचालक मंडळ निवडून देत आहे.

राज्य सरकारने (state government) गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीचे सरपंच व सगळ्या नगर पंचायती, नगर परिषदा व नगरपालिका यांचा नगराध्यक्ष थेट जनतेच्या मतदानाने निवडून आणावे असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे त्याचप्रमाणे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती म्हणजेच अध्यक्षांची निवड ही थेट शेतकऱ्यांच्याच मतदानातून झाली पाहिजे.

अशाप्रकारे निवड झाल्यास राला घोडेबाजाराला आळा बसेल व शेतकऱ्यांच्या आवडीचा सभापती निवडून येईल व शेतकऱ्यांची सर्वच कामे मार्गी लागतील असा विश्वास शिवाजी चुंभळे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचेही शिवाजी चुंभळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com