दुचाकीवरील भामट्यांनी महिलेची पोत लांबविली

दुचाकीवरील भामट्यांनी महिलेची पोत लांबविली

नाशिक । Nashik

दुचाकीवर (two wheeler) आलेल्या तीन भामट्यांनी पाथर्डी फाटा परिसरात (Pathardi phata area) एका महिलेच्या (woman) गळ्यातील सोन्याची पोत (Gold Vessel) ओरबाडून पोबारा केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली शरद कहांडळ (२७,रा. फ्लॅट नंबर ४०१, अंजनी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, निसर्ग कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक ) या (दि.२८ ) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अंजनी अपार्टमेंट समोरील रस्त्यावरून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघा भामट्यांनी वैशाली यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून पळ काढला.

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (indiranagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी सय्यद करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com