चाचडगाव टोलनाकाप्रश्‍नी धनराज महालेंनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

चाचडगाव टोलनाकाप्रश्‍नी धनराज महालेंनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

नाशिक-पेठ महामार्गावरील चाचडगाव येथील टोलनाक्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने स्थानिक नागरिकांनी टोलनाक्याच्या विरोधात उठाव केला आहे. आजी माजी लोकप्रतिनिधींनी यात उडी घेतली असून टोलनाक्याच्या समस्यांबाबत माजी आमदार धनराज महाले यांनीही याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेवून स्थानिकांना टोल मुक्ती देण्याची मागणी केली आहे.

नाशिक - पेठ महामार्गावरील चाचडगाव येथील टोलनाक्याबाबत चर्चा करण्यात आली. टोलचालक हा स्थानिक शेतकरी व 25 कि.मी.च्या आतील गावांना सक्तीची टोल वसूली चालू आहे ती त्वरीत थांबवावी व शासनाचा जीआर नुसार टोल नाक्यापासून 25 कि.मी अंतरावर असणार्‍या गावांना टोलमुक्ती व्हावी याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करण्यात आली.

चाचडगाव टोलनाकाप्रश्‍नी धनराज महालेंनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
Nashik Crime News : गुटख्याची तस्करी करणार्‍या दोघांना अटक; 'इतक्या' लाखांचा गुटखा जप्त

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावर दादा भुसे यांनी गणपती विसर्जनानंतर तत्काळ बैठक लावून तात्काळ अधिकारी, टोलचालक, प्रांत, तहसीलदार यांची तात्काळ बैठक लाऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच माळेगाव ता. पेठ येथील हुतात्मा स्मारकाबाबत पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झाली.

भुसे यांनी हुतात्मा स्मारकला लवकरात लवकर निधी मिळून आश्वासन दिले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सुनील पाटील, सहकार नेते सुरेश डोखळे, सुभाष मेधने, संतोष काहाने, नाना मोरे, जीवन मोरे, पद्माकर कामडी, जगदीश शिरसाठ, गोपाळ देशमुख, धर्मराज चौधरी, घनशाम महाले, पप्पू मुळाणे, ज्ञानेश्‍वर पेलमहाले, चिंतामण गांगोडे, भीमराव भोये, आंबदस भोये, बाळू भोये आदी उपस्थित होते.

चाचडगाव टोलनाकाप्रश्‍नी धनराज महालेंनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com